Advertisement

लोकल सेवा सुरू करण्याची मागणी योग्यच, पण अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच

लोकल सेवा सुरू करण्यात यावी, ही सर्वसामान्य प्रवाशांची मागणी अत्यंत रास्त आहे. परंतु लोकल ट्रेन सुरू करायची की नाही याचा अंतिम निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.

लोकल सेवा सुरू करण्याची मागणी योग्यच, पण अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच
SHARES

लोकल सेवा सुरू करण्यात यावी, ही सर्वसामान्य प्रवाशांची मागणी अत्यंत रास्त आहे. परंतु लोकल ट्रेन सुरू करायची की नाही याचा अंतिम निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत टोपे बोलत होते. (maharashtra cm uddhav thackeray will take final decision on mumbai local train should start or not says health minister rajesh tope)

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हालाही रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्या, अशी मागणी करत शेकडो संतप्त प्रवाशांनी बुधवारी नालासोपारा एसटी स्टँडमध्ये जोरदार आंदोलन केलं. त्यानंतर रेल्वे रुळांवर घुसून ठिय्या आंदोलन देखील केलं. या घटनेवर भाष्य करताना राजेश टोपे म्हणाले की, लोकल सेवा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी अगदीच रास्त आहे. परंतु लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं शक्य नाही. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात असं पाऊल उचलणं धोक्याचं ठरू शकतं. तरीही लोकल ट्रेन सुरु करायच्या की नाही याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.

हेही वाचा - नालासोपारा एसटी स्टॅंड परिसरात प्रवाशांचा उद्रेक

नालासोपारा एसटी स्टँडमधून दररोज १०० ते १५० एसटी बस कर्मचाऱ्यांसाठी सोडण्यात येतात. मात्र, बुधवारी सकाळी बराचवेळ थांबूनही एसटी स्थानकातून एकही बस सोडण्यात आली नाही. चौकशी केली असता एसटी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. त्यामुळं कामावर जाणाऱ्या प्रवाशांचा संयम सुटला आणि या संतप्त प्रवाशांनी घोषणाबाजी देत आंदोलन सुरू केलं. या आंदोलनता एक एक करत शेकडो प्रवासी सहभागी झाले आणि एसटी स्थानकात एकच गोंधळ उडाला.

नालासोपारा स्थानकातून ज्या एसटी बस सोडण्यात येतात, त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी अपुऱ्या असतात. यामुळे प्रत्येक बसमध्ये चांगलीच गर्दी होते. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळता येत नाहीत. प्रवाशांना काही तास तिष्ठत वाट बघावी लागते. यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, अशी या प्रवाशांची मागणी होती. एसटी स्टँडसोबतच या प्रवाशांनी नालासोपारा रेल्वे स्थानकात घुसून रेल्वे रुळांवर बसून आंदोलन केलं. साधारणत: २ ते ३ हजार प्रवाशांची गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उलाडा. अखेर पोलिसांनी मध्यस्ती करून काही वेळात परिस्थिती आटोक्यात आणली. 

दरम्यान, सद्याच्या स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिम आणि शॉपिंग मॉल सुरु करावेत की नाही? याबाबत राज्य सरकार अनेक अंगांनी विचार करत आहेत. त्यातील व्यायामशाळा अर्थातच जिम जनतेच्या आरोग्यांच्यादृष्टीनं गरजेचं असल्याने त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल. याबाबतचा निर्णय देखील लवकरच सर्वांना कळवण्यात येईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

हेही वाचा - जिम, माॅल सुरू करणार पण.., राजेश टोपेंनी केला खुलासा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा