Advertisement

पीडीएफ पुस्तकांचा मोठा फायदा, १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू

१०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात बालभारतीच्या ऑनलाईन उपलब्ध असलेल्या पीडीएफ स्वरूपातील पुस्तकांमुळं विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू राहिलं आहे.

पीडीएफ पुस्तकांचा मोठा फायदा, १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, शाळा आणि शैक्षणिक संस्थादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा सुरू राहणार याबाबत पालकांमध्ये आहे. परतु, असं असलं तरी १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात बालभारतीच्या ऑनलाईन उपलब्ध असलेल्या पीडीएफ स्वरूपातील पुस्तकांमुळं विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू राहिलं आहे.

बालभारतीच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत नवीन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी दहावीची १० लाखाहून अधिक तर बारावीची २० लाखाहून अधिक पुस्तकं डाऊनलोड करण्यात आली आहेत. या पुस्तकांमुळं १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा श्रीगणेशा नेहमीप्रमाणं झाला असून अभ्यास लॉकडाऊनमध्ये सुरू आहे. तसंच, राज्य मंडळाचा १२वीचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२०-२१) बदलला आहे.

नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी नवी पुस्तकं विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. यंदाही बालभारतीनं मार्चअखेरीस १२वीची सर्व पुस्तकं दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्याचं नियोजन केलं होतं. मात्र, लॉकडाऊन न उठल्यास विद्यार्थ्यांना दुकानांमध्ये ती पुस्तकं पोहोचणं व पर्यायानं विद्यार्थ्यांना ती मिळणं शक्य होणार नाही. त्यामुळं १२वीची पुस्तकं बालभारतीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. 

१ली ते ११वीची तब्बल ६१ लाख २० हजार ७०० पुस्तकं बालभारतीच्या वेबसाईटवरून विद्यार्थ्यांनी डाउनलोड केली आहेत. याशिवाय या वर्षी राज्यामध्ये समग्र शिक्षा अंतर्गत ५ कोटी ७३ लाख ३०  हजार २६९  मोफत पाठ्यपुस्‍तकं आणि बाजारातील विक्री अंतर्गत ३ कोटी ८७  लाख ५ हजार पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

Coronavirus Updates: ३ लाखाहून अधिक धारावीकरांची तपासणी

निवासी डॉक्टरांना आठवड्यातील ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा