कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यात सोशल मिडियाच्या माध्यमातून काही समाजकंटक अफवा पसरवून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करतात. अनेक ठिकाणी या अफवांमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ लागल्याने अशा समाज कंटकांविरोधात सायबर पोलिसांनी कडक पाऊल उचलण्यास सुरूवात केली. लाँकडाऊनच्या काळात सायबर पोलिसांनी तब्बल ५१४ गुन्हे नोंदवले असून २७३ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे.
हेही वाचाः- लालबागचा राजा जनतेसाठी आदर्श, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मंडळाचं कौतुक
महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ५१४ गुन्ह्यांची (ज्यापैकी ३९ N.C आहेत) नोंद ३० जुन २०२० पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९७ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २१४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, tiktok विडिओ शेअर प्रकरणी २८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ११ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, Youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ६० गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २७३ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.
हेही वाचाः- खासगी रुग्णवाहिकांकडून होणारी लूट आता थांबणार, खासगी रुग्णवाहिका शासन ताब्यात घेणार
ध्याच्या काळात बरेच लोक समाज माध्यमांचा जास्त प्रमाणात वापर करत आहेत इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे . ऑनलाईन पुस्तके,साहित्य ,गाणी,चित्रपट ,वेबसेरीज व अन्य गोष्टी अधिकृत संकेतस्थळावरून विकत घ्यावे किंवा बघावे . अशा गोष्टी अनधिकृत संकेतस्थळांवर बघणे हा कायद्याने गुन्हा आहेच , तसेच अशा संकेतस्थळांवरूनतुमच्या नकळत एखादे मालवेर किंवा संगणक वायरस येऊन तुमचा संगणक किंवा मोबाईल हॅक केला जाऊ शकतो,असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.