Advertisement

लालबागचा राजा जनतेसाठी आदर्श, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मंडळाचं कौतुक

लाबागच्या राजा मंडळाच्या निर्णयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे.

लालबागचा राजा जनतेसाठी आदर्श, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मंडळाचं कौतुक
SHARES

नवसाला पावणारा म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राजाला ८६ वर्षांची पंरपरा आहे. मागील ८६ वर्षांपासून लालबागमधील मार्केटमध्ये राजाची मूर्ती विराजमान होते. अनेक वर्षांपासून राजाची १४ फुट उंचीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवर्जून येतात.

मात्र यंदा कोरोनामुळे उत्सवाऐवजी रक्तदान शिबिरं आणि प्लाझमा थेरपी शिबिरं राबवण्यात येणार आहेत. याशिवाय समाजभान राखत मंडळाने उत्सव साजरा न करण्याला प्राधान्य दिलं आहे.

लाबागच्या राजा मंडळाच्या निर्णयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की, “लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजानं जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला आहे. या निर्णयानं राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे.

लालबाग राजा गणेशोत्सव मंडळानं ११ दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे. सध्या महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर असतानाच राज्यासमोर असणारं कोरोनाचे संकट लक्षात घेता मंडळानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसंच मंडळाकडून २५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात मंडळानं ट्विटवरुनही एक ट्विट केलं आहे.

“लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन २०२० लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता भाविकांसाठी सदर वर्षी लालबागचा राजा ‘आरोग्य उत्सव’ साजरा करणार आहे,” असं लालबागचा राजा मंडळाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करण्यात आलं आहे.हेही वाचा

Ganeshotsav 2020: यंदा ४ फुटांचीच मूर्ती; अनेक मंडळांचा ऐतिहासिक निर्णय

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा