Advertisement

Ganeshotsav 2020: यंदा ४ फुटांचीच मूर्ती; अनेक मंडळांचा ऐतिहासिक निर्णय


Ganeshotsav 2020: यंदा ४ फुटांचीच मूर्ती; अनेक मंडळांचा ऐतिहासिक निर्णय
SHARES

कोरोना या जीवघेण्या संसर्गामुळं अनेक सणांवर संकट आलं आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सव तसंच गणेशोस्तवावर कोरोनाचं सावट आहे. मुंबईत गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गणेशोत्सवातील ११ दिवस मुंबई तोरणांच्या माळा, विद्युत रोषणाईनं सजलेली असते. परंतु, यावर्षी गणेशोत्सव आपल्याला साधेपणानं साजरा करणं आवश्यक आहे. यासंदर्भात मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा करत आवाहन केलं आहे.

यावर्षी गणेशोत्सव साधेपणानं साजरा करूया. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्वाची नाही तर भक्ती महत्वाची आहे. मूर्ती ४ फुटापर्यंत असावी. महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये. हा निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मोठ्या गणेश मंडळाशी चर्चा केली.

उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर व कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक मंडळांनी गणपती बाप्पाच्या मूर्तीची उंची कमी ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा