Advertisement

ganesh chaturthi 2020: यंदा गणेशोत्सवच नाही; 'लालबागचा राजा' मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

लालबागमधील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं देखील ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

ganesh chaturthi 2020: यंदा गणेशोत्सवच नाही; 'लालबागचा राजा' मंडळाचा ऐतिहासिक निर्णय
SHARES

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील सर्व सण उत्सवांवरही कोरोनाचं सावट आहे. अवघ्या ५३ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवरही कोरोनाचं मोठं संकट ओढावलं आहे. अनेक मंडळांनी गणपतीच्या मोठ्या मूर्ती न बसवता लहान मुर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच लालबागमधील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं देखील ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

राज्यावर कोरोनाचं संकट असल्यानं मंडळायानं यंदा गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यसेवा साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 11 दिवस गणपती बाप्पाची मुर्ती न बसवता 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे.

सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. दरवर्षी लालबागच्या राजाला होणारी गर्दी लक्षात घेता मंडळानं ऐतिहासिक निर्णय घेत आरोग्यसेवा करणार असल्याचं सांगितलं आहे. लालबागच्या राजाची ख्याती खुप मोठी आहे. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, क्रिकेटपटू या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. एवढचं नाहीतर देशविदेशातून लोकं बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. पण यंदा हा उत्सव होणार नाही. गणेशोत्सवात लालबागमध्ये लाखो भाविक येत असतात गर्दीत कोरोनाची लागण असलेल्यांचा वावर आला तर कित्येकांना यांची लागण होऊ शकते आणि परिणामी शासकीय यंत्रणेवरचा ताण वाढू शकतो तसेच कोरोनाग्रस्तांचा आकडाही वाढू शकतो त्यामुळेच सणासुदीला गालबोट लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

देशासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असेलेल्या लालबागच्या राजाला ८६ वर्षांची पंरपरा आहे. गेली ८६ वर्ष लालबाग मार्केटमध्ये लालबागचा राजा विराजमान होतो. १४ फुटी उंच आणि मनमोहक अशी बाप्पांची मुर्ती असते. नवसाला पावणारा म्हणून अनेक गणेशभक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. हेही वाचा -

सम विषम नियम लागू केल्यास टळेल वाहतूक कोंडी

मुंबई मेट्रो-३साठी पावसाळी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्जRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा