Advertisement

मुंबई मेट्रो-३साठी पावसाळी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज


मुंबई मेट्रो-३साठी पावसाळी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज
SHARES
Advertisement

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ची मुंबईत उभारणी करण्यात येत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल)द्वारे हे काम केलं जात असून, या भुयारी मेट्रोसाठी पावसाळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. एकूण ४२८ जलशोषण पंप आणि १५ तात्काळ सेवा वाहनं यांचं आयोजन मुंबई मेट्रो ३च्या सात पॅकेजेससाठी करण्यात आलं असल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली आहे. मेट्रो-३च्या भुयारीकरणासह उर्वरित काम वेगानं सुरू असून, आतापर्यंत भुयारीकरणाचे काम ८३ टक्के झाले आहे. तर प्रकल्पाच्या एकूण कामांपैकी ५६ टक्के काम पूर्ण झाले आहे.

मेट्रो-३ ही वांद्रे-कुर्ला संकुलात मेट्रो २-बला जोडली जाईल. याव्यतिरिक्त चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, महालक्ष्मी येथील मोनोरेल स्थानक, मेट्रो-१ला मरोळ, मेट्रो-६ला आरे येथे मेट्रो-३ जोडली जाणार आहे. त्याशिवाय विमानतळाशीही मेट्रो-३ कनेक्ट असणार आहे. मुंबईच्या रेल्वेतून सुमारे ७५ लाख प्रवाशांना रोजचा प्रवास करावा लागतो. ३३.५ कि.मी. लांबीचा हा मेट्रो मार्ग उपनगरीय रेल्वेमधील गर्दी कमी करू शकतो.

मुंबई मेट्रो-३ प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रहदारीचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून येणार आहे. मुंबई मेट्रो-३ प्रकल्पामुळं सुमारे १६ लाख रेल्वे प्रवाशांना वातानुकूलित डब्यातून प्रवास करणं शक्य होणार आहे. प्रवासाच्या वेळेत घट, ध्वनी व हवेच्या प्रदूषणात घट, सुरक्षित व आरामदायी प्रवास अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध होणार असून, संपूर्णपणे भुयारी मेट्रो मार्गावर २७ स्थानकं असणार आहेत.हेही वाचा -

Mumbai Local: मुंबई लोकलच्या ७०० फेऱ्या, केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच

Marathi Compulsory: सरकारी कामकाजात मराठी न वापरल्यास वेतनवाढ रोखणार, ठाकरे सरकारचा निर्णयसंबंधित विषय
Advertisement