Advertisement

Mumbai local: मुंबई लोकलच्या ७०० फेऱ्या, केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच

अनलॉकचा दुसरा टप्पा बुधवारपासून सुरू होत असून, मुंबईतील लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

Mumbai local: मुंबई लोकलच्या ७०० फेऱ्या, केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं मुंबईची लाइफलाइन तब्बल ३ महिने बंद होती. परंतु, अनलॉक 1.0च्या अंतर्गत वाहतूक सेवा सुरू करण्यात आली असून लोकलही सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला. त्यानुसार, मुंबईत लोकल धावत आहेत. त्याशिवाय, अनलॉकचा दुसरा टप्पा बुधवारपासून सुरू होत असून, मुंबईतील लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दोन्ही मार्गावर प्रत्येकी ३५० पर्यंत फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं दोन्ही मार्गावर मिळून मुंबईमध्ये लोकलच्या ७०० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

तब्बल ७०० लोकलच्या फेऱ्या चालविण्यात येणार असून या केवळ अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच या लोकल धावणार आहे. मुंबईतील विशेष लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या लोकलमधून महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, आयटी, जीएसटी, सीमा शुल्क, टपाल विभाग, राष्ट्रीय बँका, एमबीपीटी, कोर्ट, सुरक्षा आणि राजभवनाच्या कर्माचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे, असं जारी केलेल्या पत्रकातून रेल्वे स्पष्ट केलं आहे. ओळखपत्र दाखवल्यावर कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासाकरता प्रवेश दिला जाणार आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर लोकलच्या ३५० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या लोकल ट्रेन फक्त जलद मार्गावर धावणार आहेत. यामुळं ठराविक स्टेशनवरच या लोकल थांबणार आहेत. हार्बर मार्गावरील लोकलही मोजक्याच स्थानकांवर थांबणार आहेत. मध्य रेल्वेवर ३० जूपर्यंत लोकलच्या २०० फेऱ्या चालवण्यात येत होत्या. त्यापैकी १३० या फेऱ्या या सीएसएमटी ते कसारा, कर्जत, कल्याण डोंबिवली आणि ठाणे या स्टेशनदरम्यान चालवल्या जात होत्या. तर ७० फेऱ्या या सीएसएमटी ते पनवेल दरम्यान चालवल्या जात होत्या.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे लोकलच्या आधी २०२ फेऱ्या चालवण्यात येत होत्या. आता त्यात १४८ फेऱ्यांची भर पडली आहे. या सर्व लोकल फक्त मोजक्याच रेल्वे स्टेशनवर थांबणार आहेत.

१६ जूनपासून रेल्वेकडून विशेष लोकल ट्रेन चालवण्यात येत असून, या लोकलमधून सुमारे सव्वा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. सव्वा लाख पैकी ५० हजार कर्मचारी पश्चिम रेल्वेवरून प्रवास करतील. राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी या विशेष लोकल चालवल्या जात आहेत.



हेही वाचा -

Marathi Compulsory: सरकारी कामकाजात मराठी न वापरल्यास वेतनवाढ रोखणार, ठाकरे सरकारचा निर्णय

Electricity Bill: ‘या’ कारणामुळे तुम्हाला आलंय जास्त लाईट बिल



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा