Advertisement

सम विषम नियम लागू केल्यास टळेल वाहतूक कोंडी


सम विषम नियम लागू केल्यास टळेल वाहतूक कोंडी
SHARES

अनलॉक 1.0 अंतर्गत मुंबईसह राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यात आला. त्यामुळं अनेक जण घराबाहेर पडत आहेत. परंतु, मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळं या वाढत्या संसर्गाला टाळण्यासाठी पोलिसांनी कडक नियम लागू केले आहेत. तसंच, २ किमी अंतराचा नियम लागू केला आहे. परंतु त्यामुळं वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु वाहनांसाठी सम विषम नियम लागू केला तर वाहतूक कोंडी टळेल, असे मत वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार यांनी व्यक्त केले.

मुंबईत वाहतूक पोलीस विविध नियम लागू करत आहेत. २ किमी अंतराबाबतचा त्यांचा निर्णय चुकीचा होता. त्यापेक्षा इतर पर्याय वापरता आले असते. दिल्लीप्रमाणे वाहनांसाठी सम विषम नियम वापरता आला असता. खासगी वाहने आणि दुचाकी यांना हा नियम लागू करायला पाहिजे. सर्व रस्त्यांवर नाही तर ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी असते ते वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, पेडर रोड, दादर येथे हा नियम लागू केल्यास वाहतूक कोंडी कमी होईल, असंही अशोक दातार यांनी सांगितले.

बेस्टकडे २५०० गाड्या आहेत. ६ हजार स्कूल बसेस अतिरिक्त आहेत, त्या चालकासह दोन-तीन महिन्यांसाठी मिळू शकतात. त्या चालकांसाठी लाँग ट्रीप दिली तर वाहतुकीवर मोठा ताण कमी होईल. त्या काळात रेल्वेचे नियोजन करायला हवे. त्याचा वाहतुकीवरील भार कमी करण्यास मदत होईल. २ किमी अंतराचा निर्णय चुकीचा आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करणे अवघड आहे. त्यावर लोकांची नाराजी आहे. पाच पाच हजार गाड्या जप्त केल्या तर त्याचे काय करायचे, असा प्रश्न आहे.



हेही वाचा -


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा