Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

ganesh chaturthi 2020: परंपरा खंडीत करू नका, ‘लालबागचा राजा’ला ‘त्यांची’ आग्रहाची विनंती

मंडळाचा हा निर्णय स्तुत्य असला, तरी या निर्णयामुळे असंख्य गणेशभक्तांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची सुरू असलेली परंपरा मंडळाने खंडीत करू नये, अशी विनंती मंडळाला करण्यात आली आहे.

ganesh chaturthi 2020: परंपरा खंडीत करू नका, ‘लालबागचा राजा’ला ‘त्यांची’ आग्रहाची विनंती
SHARES

कोरोना संकट आणि लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता यंदाचा उत्सव आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्याची ऐतिहासिक घोषणा ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केली आहे. मंडळाचा हा निर्णय स्तुत्य असला, तरी या निर्णयामुळे असंख्य गणेशभक्तांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची सुरू असलेली परंपरा मंडळाने खंडीत (lalbaugcha raja must celebrate ganesh chaturthi 2020 says BSGSS president naresh dahibavkar  ) करू नये, अशी विनंती मंडळाला करण्यात आली आहे.

समितीचं पत्र

‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याच्या निर्णयाची घोषणा केल्यावर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती या सर्व गणेशोत्सव मंडळांच्या मध्यवर्ती संघटनेने ‘लालबागचा राजा’ला एक विनंतीचं पत्र पाठवलं आहे. या पत्रात समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी मंडळाचा उद्देश कौतुकास्पद असला, तरी मंडळाने आपली परंपरा खंडीत करू नये अशी आग्रहाची विनंती केली आहे. 

हेही वाचा - यंदा गणेशोत्सवच नाही; 'लालबागचा राजा' मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

सुवर्णमध्य काढा

ते आपल्या पत्रात म्हणतात की, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार ४ फुटांपर्यंत गणेशमूर्तीची उंची ठेवून ‘लालबागचा राजा’ मंडळाने भाद्रपद उत्सवाची परंपरा अखंडित ठेवावी व यंदा भाविकांसाठी केवळ लाइव्ह दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, अशी समन्वय समितीची इच्छा आहे. हजारो मंडळांनी भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून यंदा साधेपणाने का हाईना परंपरा खंडीत न करता गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागचा राजा मंडळाच्या निर्णयाला समन्वय समितीचा विरोध नाही. मात्र परंपरा अखंडित ठेवता येईल यासाठी काहीतरी सुवर्णमध्य काढला जावा, असं सर्वांनाच वाटत आहे, असं मत दहिबावकर यांनी व्यक्त केलं.

काय ठरवलंय मंडळाने? 

देशासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असेलेल्या लालबागच्या राजाला ८६ वर्षांची पंरपरा आहे. गेली ८६ वर्ष लालबाग मार्केटमध्ये लालबागचा राजा विराजमान होतो. १४ फुटी उंच आणि मनमोहक अशी बाप्पांची मूर्ती असते. नवसाला पावणारा म्हणून लाखोंच्या संख्येने गणेशभक्त दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. 

परंतु राज्यावर कोरोनाचं संकट असल्यानं मंडळानं यंदा ११ दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता ११ दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. करोना लढ्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबातील २० वीरमातांचा सन्मान करण्यासोबतच गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा मंडळातर्फे सन्मान करण्यात येणार आहे. शिवाय मंडळाकडून मुख्यमंत्री सहायता निधीत २५ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा