Advertisement

लालबागचा राजा मंडळाकडून 'हायजेनिक' रक्तदान शिबिराचं आयोजन

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं सोमवारपासून हायजेनिक रक्तदान शिबिराला सुरूवात केली आहे.

लालबागचा राजा मंडळाकडून 'हायजेनिक' रक्तदान शिबिराचं आयोजन
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबिरांची आवश्यकता असल्याची म्हटलं होतं. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत लालबाग राजा मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत रक्तदान शिबिराला सुरूवात केली आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं सोमवारपासून हायजेनिक रक्तदान शिबिराला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान केलं जात आहे. १ एप्रिलपर्यंत सकाळी ९ ते ५ या कालावधीत हे शिबिर चालणार आहे.

या रक्तदान शिबिराला सोमवारी सकाळी ९ वाजता सुरुवात करण्यात आली. 1 एप्रिलपर्यंत रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत हे रक्तदान शिबीर चालू राहणार आहे. लालबागचा राजा योग केंद्रात या शिबिराच आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्याच्या रक्त संक्रमण परिषदेच्या मान्यतेने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

१० दिवसांच्या या शिबिरात रक्तदात्यांची अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त घेतलं जाणार आहे. त्याशिवाय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेतली जात आहे. २ रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात येत आहे. शिवाय, स्वच्छतेची विशेष खबरदारी घेतली जात असल्याचं समजतं.

कोरोनामुळं नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. त्याशिवाय, उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठं रक्तदान शिबिर कोरोनामुळं आयोजितच केलं गेलं नाहीत. त्यामुळं राज्यात अवघ्या १५-२० दिवसांचाच रक्त साठा शिल्लक असल्याची माहिती स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. शिवाय, छोट्या स्तरावर रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे आवाहनही केले.



हेही वाचा -

डॉक्टरांवर हात उचलणाऱ्यांना आता आपली चूक कळली असेल : राज ठाकरे

'ओला'ची शेअर राईड सुविधा तात्पुरती स्थगित



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा