Advertisement

'ओला'ची शेअर राईड सुविधा तात्पुरती स्थगित

ओला कंपनीनेही शेअर राईड ही सुविधा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

'ओला'ची शेअर राईड सुविधा तात्पुरती स्थगित
SHARES

कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, दिवसेंदिवस अनेक शहरांमध्ये कोरोनाचे बाधित रुग्ण सापडत आहेत. महाराष्ट्रात खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनं रेल्वे आणि लोकल सेवा रद्द केल्या आहेत. याचसोबत आंतरराज्य बस सेवांवरही बंद करण्यात आल्या आहेत. तसंच, आता ओला कंपनीनेही शेअर राईड ही सुविधा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खासगी टॅक्सी पुरवणाऱ्या ओला कंपनीनेही शेअर राईड ही सुविधा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेअर राईड या संकल्पनेत, २ किंवा ३ लोकांना एकाच गाडीतून प्रवास करता येतो. ओला कंपनीनं यासंदर्भात एक परिपत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे. 'प्रवासी आणि आमचे चालक यांच्या तब्येतीची काळजी घेणं हे सध्याच्या परिस्थितीत आमचं महत्वाचं कर्तव्य आहे. प्रत्येक गाडी ही स्वच्छ राहिल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. याचाच एक भाग म्हणून संसर्ग टाळण्यासाठी आम्ही शेअर राईड ही सुविधा तात्पुरती स्थगित करत आहोत', असं पत्रात महटलं आहे.

शेअर राईड ही संकल्पना रद्द केली असली तरीही ओला कंपनीची सुविधा सुरुच राहणार आहे. दरम्यान, सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली असली तरी नागरिकांची रस्त्यावर गर्दी आहे. राज्य सरकारनं राज्यात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, अनेक मुंबईकर या कायद्याचं पालन करत नाही आहेत. आपली वाहनं घेऊन घराबाहेर पडत आहेत. त्यामुळं कोरोना व्हायरसचं गांभिर्य लोकांमध्ये नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.



हेही वाचा -

एपीएमसी मार्केट २५ ते ३१ मार्च राहणार बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा