Advertisement

एपीएमसी मार्केट २५ ते ३१ मार्च राहणार बंद


एपीएमसी मार्केट २५ ते ३१ मार्च राहणार बंद
SHARES

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत लॉकडाउन करण्यात आलं आहे. यामधून अत्यावश्यक सेवांना वगळता आलं आहे. राज्यात कोरोनामुळं जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, तरीही मुंबईतील रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहनांची गर्दी पाहायला मिळते आहे. दरम्यान, कोरोना हा संसर्गजन्य असल्यानं गर्दी करू नका असं आवाहन वारंवार राज्य सरकार, पोलीस, डॉक्टर यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यानुसार, पार्क, मॉल्स, थिएटर्स, जलतरण यांसह अनेक गर्दीची ठिकाणं बद करण्यात आली आहेत. अशातच आता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट २५ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

या एपीएमसी मार्केटमधून मुंबई-ठाण्याला भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. परंतु आता हे भाजीपाला मार्केट २५ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, या काळात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवू नये यासाठी २४ तारखेला मार्केट सुरू राहणार आहे. नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमध्ये रोज २००० गाड्यांमधून माल येतो. तसंच दररोज ६ हजार लोकांची येथे वर्दळ असते. आता लॉकडाउनमुळे बहुतेक जण घरी आहेत. 

अनेक जण गावाला निघून गेले आहेत. लोकांची गर्दीच आता कमी झाली आहे. शिवाय शनिवारी एकूण मालापैकी २५० गाड्या माल वाया गेला आहे. त्यामुळं मार्केट बंद ठेवण्यात आलं आहे. या काळात एपीएमसीमधील भाजीपाला, फले, कांदा-बटाटा मार्केट बंद राहणार आहे. त्यामुळं येत्या काळात सर्वसामान्यांना या सर्वांचीच चणचण भासण्याची शक्यता आहे.

याआधी एपीएमसी मार्केटनं खबरदारी म्हणून काही उपायोजना करण्याचा निर्णय घेतला होता. एपीएमसी मार्केटमध्ये ग्राहकांनी गर्दी करु नये, यासाठी होलसेल व्यापाऱ्यांनी ग्राहकांना मार्केटमध्ये येण्याऐवजी फोनवरुन ऑर्डर देण्याचं आवाहन केलं होतं. रोग प्रतिबंधक उपायोजनांसाठी गुरुवार आणि रविवार असे २ दिवस एपीएमसी बाजारपेठ बंद ठेऊन स्वच्छता करण्यात येणार होत. पण आता २५ ते ३१ मार्चपर्यंत पूर्ण एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



हेही वाचा -

Corona Virus: कोरोनाशी दोन हात करण्यासाठी या उद्योगपतीने दिले इतके पैसे

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर, तर मुंबईत आणखी एकाचा मृत्यू



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा