Advertisement

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर, तर मुंबईत आणखी एकाचा मृत्यू

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर, तर मुंबईत आणखी एकाचा मृत्यू
SHARES

मुंबईसर राज्यभरातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ आता झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. रविवारी संध्याकाळपासून १५ नव्या रुग्णांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तसंच आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

फिलिपन्समधून आलेल्या ६८ वर्षीय पुरूषाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. परदेशातून आलेल्या या रुग्णाची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र, कोरोनाची लागण झाल्याचं समजताच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णाला कस्तूरबा रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ व रुग्णांचा होणारा मृत्यू ही महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी आहे. रविवारी संध्याकाळपासून महाराष्ट्रात १५ नवे रुग्ण आढळसे असून, यामधील १४ रुग्ण हे मुंबईचे आहेत. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घ्या असं वारंवार आवाहन राज्य सरकारकडून करण्यातत येत आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केली आहे. काही खाजगी व सरकारी वाहतूक सेवा सुरू आहेत. मात्र, वाहतुक सेवेतून अत्यावश्यकांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परंतु, आता रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारनं नागरिकांना घरा बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा