Advertisement

डॉक्टरांवर हात उचलणाऱ्यांना आता आपली चूक कळली असेल : राज ठाकरे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपले बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. वाचा काय बोलले ते...

डॉक्टरांवर हात उचलणाऱ्यांना आता आपली चूक कळली असेल : राज ठाकरे
SHARES

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. परिस्थितीत दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करण्याची  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिलीच वेळ असेल. पण अनुभव नसताना देखील ते चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळत असल्याचं अनेकांनी कबुल केलं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपले बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं.


काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी उद्धव यांच्याशी बोनवरून संवाद साधला. कोरोना संकटावर दोघा भावांचात चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव यांचं कौतुक केलं. 'मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोललो. ते योग्य प्रकारे काम करत आहेत.' अशा शब्दात राज यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.


डॉक्टरांवर हात उचलणाऱ्यांना...

'जी लोकं डॉक्टरांवर हात उचलत होते, त्यांना आज जाणीव झाली असेल. डॉक्टरांना परिवार नाही का? जीव धोक्यात घालून ती लोकं आपल्यासाठी लढत आहेत. पण काही लोकं रस्त्यावर उतरून पोलिसांसोबत हुज्जत घालत आहेत. लाज वाटत नाही का? ज्या गोष्टी आपणहून पाळायला पाहिजे त्या पाळणं आवश्यक आहे. जे या कठीण प्रसंगी मदतकार्य करत आहेत. त्या सर्व डॉक्टर पोलिसांना धन्यवाद देतो, अशा शब्दात राज यांनी डॉक्टर आणि पोलिसांचे आभार मानले.


जनता कर्फ्यूवर प्रश्नचिन्ह

व्हायरस पसरला तर तो आवरण्यासाठी यंत्रणा आहेत का? जनता कर्फ्यूनंतर टाळ्या वाजवण्यासाठी लोकं टोळक्यानं बाहेर येत होते. जल्लोष करत होते. लोकांना काही गांभीर्य आहे की नाही? प्रत्येकाच्या घरावर टकटक झाली तरच आपण ऐकणार का?' असा संतप्त सवाल राज यांनी उपस्थितीत केला.


"कुपया घरी बसा"

'कोरोना आपल्या मागे हात धुऊन लागला आहे. जनतेला हात जोडून विनंती आहे. हे प्रकरण सहज घेऊ नका. निर्बंधांची ३१ मार्चची तारीख पुढे जाणार असंच चित्र आहे. आज जी लोकं टोलनाक्यावर गर्दी करत आहेत. त्यांना विनंती आहे की घरी बसा. जे काही चालू आहे ते आपल्या जगण्यासाठी चालू आहे', असं आवाहनही राज ठाकरे यांनी लोकांना केलं.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा ८९ वर गेला आहे. मुंबईत ३ जणांचा मृत्यू झालाी आहे. दिवसेंदिवस वाढता आकडा पाहता राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर पडत चाचली आहे.




हेही वाचा

Lock Down ने भागेल असं वाटत नाही, संचारबंदी कराच, मुख्यमंत्र्यांना आवाहन

Coronavirus Updates: तर, नाईलाजाने कारवाई करावीच लागेल- राजेश टोपे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा