क्रेन दुर्घटनेमुळे पश्चिम द्रूतगती मार्ग ठप्प, अपघातात एका महिलेचा मृत्यू

File Photo
File Photo
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या पश्चिम द्रतगती मार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामा दरम्यान क्रेनचा भीषण अपघात झाला. सकाळी ६ च्या सुमारा हा अपघात झाल्यामुळे पश्चिमद्रतगती मार्गावर सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. क्रेन कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचाही मृत्यू झाला असून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेतलेली आहे. फाल्गुनी पटेल असं या मृत महिलेचं नाव होतं. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार चालकाचा शोध घेत आहेत.

हेही वाचाः-मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर आतापर्यंत साडेतीन कोटींचा दंड वसूल

मुंबईत अंधेरी दरम्यान पहाटे ६ वाजताच्या सुमारास वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोचा क्रेन कोसळून एका महिला मृत्यू झाला. चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेनंतर चालक फरार झाला होता. अपघातग्रस्त क्रेन जोगेश्वरीहून वांद्रे येथे घेऊन जाण्यात येत होतो. यावेळी हा अपघात झाला. या अपघातात क्रेनचे दोन तुकडे झाले. तसेच क्रेनचा काही भाग तेथील बस स्टॉपवर उभ्या असलेल्या महिलेच्या अंगावर पडला. यात तिचा जागेवर मृत्यू झाला. अपघातात मृत झालेली महिला अंधेरीतील गुंदावली बस स्टॉपजवळ उभी होती. मात्र, यावेळी या महिलेवर काळाने घाला केला आणि अपगातग्रस्त क्रेनचा काही भाग तिच्या अंगावर कोसळला. फाल्गुनी पटेल असं या मृत महिलेचं नाव होतं.

हेही वाचाः- प्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करण्यात रेल्वे प्रशासनाची गाडी अद्याप धीम्या मार्गावर

या अपघातामुळे मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या (Western Express Highway) दोन्ही बाजूंनी वाहनांची प्रचंड गर्दी झाली असून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबचं-लांब रांगा लागल्या आहेत. गेल्या काही तासांपासून प्रवासी वाहनांमध्ये अडकले आहेत. वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज पहाटे अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर (Andheri)  मेट्रोचा क्रेन (Metro Crane) कोसळून भीषण अपघात झाला होता. सध्या हे क्रेन बाजूला काढण्याचं काम सुरू आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या