Advertisement

प्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करण्यात रेल्वे प्रशासनाची गाडी अद्याप धिम्या मार्गावर

प्रवाशांच्या गर्दी नियोजनासाठी रेल्वे व राज्य सरकारची तयारी अपुरी राहिली आहे.

प्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करण्यात रेल्वे प्रशासनाची गाडी अद्याप धिम्या मार्गावर
SHARES

लॉकडाऊनमुळं बंद असलेली मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा (mumbai local) टप्प्याटप्प्यात सर्वासाठी खुली करण्यात येत आहे. परंतू, राज्य सरकारनं (state government) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. परिणामी लोकलमध्ये प्रवासी संख्या वाढत असून लोकल (local) फेऱ्यांची संख्या अपूरी पडत आहे. त्यामुळं येत्या काळातही लोकल सर्वासाठी खुली झाल्यास गर्दी नियोजन करणार कसं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुंबईसह राज्यातील नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीनं राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आला. शिवाय वाहतूक सेवाही सुरुवातीला बंद करण्यात आली. परंतू, लोकल बंद करण्याबाबत राज्य सरकार, महापालिका व रेल्वे प्रशासनाचं एकमत होत नव्हतं. त्या इतर वाहतूक बंद झाली तरी लोकल सुरू होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत गेल्यानं अखेर लोकल सेवा बंद करण्यात आली.

सर्व वाहतूक सेवा बंद असल्यानं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपला खिसा रिकामा करत प्रवास करावा लागत होता. मात्र, प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत लोकल पुन्हा सुरू करण्यात आली. सुरुवातीला केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावणारी लोकल आता इतर कर्मचारी वर्गाला ही वाहतूक सेवा देत आहे. यामध्ये वकील, बँक, खासगी सुरक्षारक्षक, मुंबईचे डबेवाले यांसह अनेकांचं समावेश आहे. विशेषतः महिला प्रवाशांनाही लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. परंतू यासर्वात प्रवाशांच्या गर्दी नियोजनासाठी रेल्वे व राज्य सरकारची तयारी अपुरी राहिली आहे.

लोकल आणि स्थानकांवरील प्रवाशांची (passenger) गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा सल्ला देणाऱ्या रेल्वेच्या या संदर्भातील कित्येक योजना अजूनही कागदावरच आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर (western railway) ३ लाख ९५ हजार आणि मध्य रेल्वेवर ४ लाख ५७ हजार प्रवासी प्रवास करत आहेत. त्यांनाही लोकल सेवा देताना रेल्वेची तारांबळ उडत होती. त्यात सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची सूचना राज्य सरकारनं केल्यानं रेल्वे प्रशासन पुरतं गोंधळून गेल्याचं दिसून येत आहे. प्रवासी संख्या मर्यादित असतानाही अपुऱ्या तिकीट खिडक्या, ऑनलाइन किंवा अन्य मार्गानं तिकीट-पास काढू देणाऱ्या बंद सुविधा यांमुळे तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा दिसतात.

मध्य रेल्वेच्या (central railway) ३०० पैकी १८० तर पश्चिम रेल्वेच्या २९२ पैकी २७० तिकीट खिडक्या सुरू आहेत, तर स्मार्ट कार्डद्वारे तिकीट देणारे एटीव्हीएम, २ रुपये अधिक देऊन तिकीट मिळणारी जनसाधारण तिकीट सेवा, मोबाइल तिकीट सुविधा, तिकीट खिडक्यांवरील पीओएस यंत्रे या तिकीट सेवा बंदच आहेत. या सेवा बंद असल्याने सर्व महिला प्रवाशांसाठी लोकल खुली झाल्यानंतर तिकीट खिडक्यांसमोर लांबच लांब रांगा लागत आहेत. रेल्वे स्थानकातील प्रवेश नियंत्रण हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी प्रत्येक स्थानकात पूर्व दिशेला आणि पश्चिम दिशेने प्रत्येकी एकच प्रवेशद्वार ठेवले आहे. 

अन्य प्रवेशद्वारे खुली केली तर एका प्रवेशद्वारावर होणारी गर्दी टाळता येईल. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लॉकडाऊनपूर्वी ३,१४१ लोकल फेऱ्या होत होत्या. आता ही संख्या १,४१० आहे. जशी प्रवासी संख्या वाढत आहे, तशी लोकल फेऱ्यांत वाढ होत आहे. मात्र रेल्वे ३,१४१ पेक्षा जास्त फे ऱ्या वाढवू शकत नाही. लोकल फे ऱ्या वाढवण्याची रेल्वेची क्षमता संपली असून महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागल्यानंतर त्यात वाढ होऊ शकते.

पश्चिम रेल्वेने अंधेरी ते विरारदरम्यान धिम्या मार्गावर १५ डबा लोकल प्रकल्पाचे काम सुरू के ले आहे. हे काम डिसेंबर २०२० पर्यंत संपणार आहे. त्यानंतर या मार्गावर पंधरा डबा लोकलच्या १३० लोकल फेऱ्यांची भर पडणार असल्याची माहिती मिळते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा