महापालिका म्हणतेय 'मुंबईत ५० ते ६० खड्डेच शिल्लक'

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांबाबत चर्चांना उधाड आलं असून काँग्रेसनं हाती घेतलेल्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा खड्ड्यांचा एपिसोड सुरुवात झालेला आहे. मात्र, महापालिकेच्या रस्त्यांवर खड्डयांचं प्रमाण कमी असून आता केवळ ५० ते ६० खड्डे भरण्याचं शिल्लक असल्याचा दावा प्रशासनानं केला आहे.

अल्टिमेटम अपूर्णच

मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे ४८ तासांमध्ये भरले जातील, असा अल्टिमेटम अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिला होता. हा अल्टिमेटम रविवारी संपला असून अजूनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डयांचं दर्शन घडत आहे. शनिवारी मुंबईच्या रस्त्यांवर सुमारे ३०० खड्डे होते. परंतु, हे सर्व खड्डे बुजवले गेले आहे. त्यानंतर काही खड्डे निर्माण झाले आहेत. ते ५० ते ६० खड्डे असून तेही बुजवले जात असल्याची माहिती रस्ते प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली आहे.

वडाळा-शीव भागांत आंदोलन

दरम्यान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईभर खड्डे मोजण्याचं आंदोलन सुरू आहे. त्यानुसार महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या नेतृत्वाखाली वडाळा-शीव भागांत आंदोलन करण्यात आलं. यामध्ये बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील खड्डे बुजवण्यात आलं. यावेळी माजी खासदार एकनाथ गायकवाड, नगरसेवक सुफियान वणू, मुणगेकर आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मनसेच्यावतीनंही महापालिका इमारतीच्या प्रतिकृतीची प्रेतयात्रा काढून खड्डयांवरून तीव्र निषेध करण्यात आला.


हेही वाचा - 

म्हणून मनसेनं मंत्रालयासमोरील फूटपाथ खोदला

मुंबईच्या रस्त्यांवर उरलेत ३०० खड्डे

पुढील बातमी
इतर बातम्या