Advertisement

म्हणून मनसेनं मंत्रालयासमोरील फूटपाथ खोदला

सरकारला खड्डे दाखवण्यासाठी त्यांच्या जाण्या-येण्याच्या ठिकाणीच खड्डे हवेत, असं म्हणत आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी मध्यरात्री चक्क मंत्रालयासमोरच रस्ता खोदला. याप्रकरणी 4 मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आता खड्ड्यांवरून सुरू झालेला वाद आणि राजकारण चांगलच पेटणार आहे.

म्हणून मनसेनं मंत्रालयासमोरील फूटपाथ खोदला
SHARES

मुंबईत रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून खड्ड्यांमुळे नागरिकांचे बळी जात आहेत. पण सरकार आणि मंत्र्यांना खड्डे दिसत नाहीत. तेव्हा त्यांना खड्डे दाखवण्यासाठी त्यांच्या येण्या-जाण्याच्या ठिकाणीच खड्डे हवेत, असं म्हणत आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी मध्यरात्री चक्क मंत्रालयासमोरील फूटपाथ खोदला. याप्रकरणी ४ मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आता खड्ड्यांवरून सुरू झालेला वाद आणि राजकारण चांगलच पेटणार आहे.



बांधकाम विभागाचं कार्यलय फोडलं

सोमवारी खड्ड्यांवरून आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं. तर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी तर 'कार्यालयांना पोलीस सरंक्षण द्या काहीही करा आम्ही अधिकाऱ्यांना घरी येता जाता मारू', अशी धमकी देत यापुढे आणखी उग्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी मध्यरात्री मनसे कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या गेटसमोरचा फूटपाथ खोदला.


राज ठाकरेंनी दिला पाठिंबा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. खड्डे दिसले तर आंदोलन दिसणारच असंही राज ठाकरे म्हणाले. मंगळवारी राज ठाकरे यांची पुण्यात पत्रकार परिषद होणार आहे. तेव्हा या पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.


हेही वाचा - 

तर, अधिकाऱ्यांना झोडपून काढू- संदीप देशपांडे

खड्ड्यात जावो जनता, आम्हाला नाही चिंता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा