परमवीर सिंह यांनी महाराष्ट्र होमगार्डचे डीजी म्हणून पदभार स्वीकारला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) नवनिर्वाचित प्रमुख परमबीर सिंह अखेर समोर आले आहेत. त्यांनी सोमवारी होमगार्डच्या मुख्यालयात जाऊन पदभार स्वीकारला आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील कारमधील स्फोटकांचा प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांना एनआयने अटक केली आहे. त्यानंतर राज्य सरकारने परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांग़़डी केली. त्यांची महाराष्ट्र होमगार्डचे डीजी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामुळे ते नाराज होते. ते होमगार्डचा पदभार न स्वीकारता सुट्टीवर गेले होते. या नाराजीतूनच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील बार आणि रेस्टाॅरंट्सकडून दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.

सोमवारी नीलिमा या शासकीय इमारतीच्या निवास्थानातून ते सकाळी दहा वाजता बाहेर पडले. त्यानंतर परमबीर सिंह यांची गाडी गिरगाव, मरिन लाईन्स, चर्चगेट स्टेशन असा प्रवास करत पुढे सरकत होती. मात्र, चर्चगेट स्टेशन समोरील सिग्नलपासून त्यांनी तात्काळ यूटर्न मारला आणि ते पुन्हा घरी गेले. यानंतर परमबीर सिंह साधारण ११.४० च्या सुमारास होमगार्डच्या कार्यालयात दाखल झाले.  कार्यालयात पोहचून त्यांनी आपले कामकाज सुरू केले आहे.

हेही वाचा- 

अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करा; परमबीर सिंह सुप्रीम कोर्टात

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, शरद पवार यांनी मागणी फेटाळली

पुढील बातमी
इतर बातम्या