Advertisement

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, शरद पवार यांनी मागणी फेटाळली

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्धवत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही मागणी पुन्हा एकदा धुडकावून लावली आहे.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, शरद पवार यांनी मागणी फेटाळली
SHARES

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक भाजपकडून होऊ लागली आहे. मात्र अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्धवत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही मागणी पुन्हा एकदा धुडकावून लावली आहे.

परमबीर सिंह यांच्या लेटरबाॅम्बमुळे निर्माण झालेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (sharad pawar) यांनी रविवारी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. जवळपास अडीच तास ही बैठक चालली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचा बचाव केला. या पत्रावर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो असून तेच यावर निर्णय घेतील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

त्यानंतर सोमवारी दिल्लीत पुन्हा पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात बैठक झाल्याचा दावा चुकीचा असल्याचं म्हटलं. एवढंच नाही, तर देशमुख या काळात रुग्णालयात दाखल असल्याचं सांगताना पवार यांनी काही कागदपत्रेही दाखवली. कोरोनाच्या संसर्गामुळे अनिल देशमुख  (anil deshmukh)नागपूरच्या रुग्णालयात ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान दाखल होते. त्यानंतर घरीच विलगीकरणात होते. त्यावेळी देशमुख कुठे होते हे स्पष्ट झाले. आरोपांवर कोणती कारवाई करावी, कशी चौकशी करावी याबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असून त्यांनी निर्णय घ्यावा, असं यावेळी शरद पवार म्हणाले. 

हेही वाचा- परमबीर सिंह यांचा लेटरबाॅम्ब कुणाला खूश करण्यासाठी?

परमबीर सिंग यांच्या पत्राच्या माध्यमातून उभं करण्यात येत असलेलं चित्र म्हणजे राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा कट आहे. परमबीर सिंग यांचे आरोप निराधार, खोटे असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

दरम्यान गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील बार आणि रेस्टाॅरंट्सकडून दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. गृहमंत्री देशमुख आपल्याला पूर्वकल्पना न देताच माझ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवत असत, पोलीस खात्यातील हा ढवळाढवळ करण्याचा प्रकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन करणारा आहे, असं देखील सिंह यांनी म्हटलं होतं.

(ncp chief sharad pawar rejected demand of anil deshmukh resignation)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा