बेस्ट (best) युनियनचे उपोषण सुरू होण्याची चिन्हे सध्या दिसून येत आहेत. हे उपोषण 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे. जर हे उपोषण सुरू झाले तर मुंबईकरांना दैनंदिन प्रवास करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागू शकतो.
शहरातील बेस्ट बसेस दररोज प्रवास करणाऱ्या 25 लाखांहून अधिक प्रवाशांसाठी (passangers) लाईफलाईन आहेत.
वेट लीज सिस्टम बंद करण्याची, प्रलंबित थकबाकी मंजूर करण्याची आणि सार्वजनिक ताफ्याची चांगली देखभाल करण्याची मागणी तीव्र असल्याने हे उपोषण सुरू होणार आहे.
मुंबईतील (mumbai) प्रमुख कॉरिडॉरमधून प्रवास करण्यासाठी बेस्ट बसेसवर अवलंबून असलेले प्रवासी यामुळे आधीच चिंतेत आहेत.
दादर (dadar), सायन (sion), अंधेरी (andheri) आणि बोरिवलीला (borivali) जोडणारे मार्ग तसेच मुंबई शहराच्या अंतर्गत भागांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. ज्या भागात मेट्रो आणि ट्रेन कनेक्टिव्हिटी मर्यादित आहे त्या भागातील प्रवासी बेस्ट बसवर अवलंबूून असतात.
हजारो मध्यमवर्गीय आणि नोकरदार कुटुंबांसाठी बस सेवा अचानक बंद पडल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकते.