वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व सामान्यांना गॅस दरवाढीचा फटका

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नववर्ष स्वागताच्या जल्लोषात मग्न झालेल्यांची झिंग एका बातमीनं नक्कीच उरणार आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस दरवाढीचा दणका ग्राहकांना बसणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९ रुपयांची वाढ केली आहे. सलग पाचव्या महिन्यात सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे

सामन्यांचा खिशाला कात्री

वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर १९ रुपयांनी महागला आहे. तर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईत ग्राहकांना घरगुती गॅससाठी ६८४.५० रुपये मोजावे लागतील. मुंबईत गॅस सिलिंडर १९.५० रुपयांनी महागला आहे. तर दिल्लीत १४.२ किलोचा गॅस सिलिंडरचा दर आता ७१४ रुपये झाला आहे

व्यावसायिक वापराचा सिलिंडर महागला

घरगुती गॅस सिलिंडरबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. व्यावसायिक वापरासाठीचा गॅस सिलिंडर ३३ रुपयांनी महागला आहे. या दरवाढीनं छोट्या व्यावसायिकांना दरवाढीची झळ सोसावी लागले. यामुळे हॉटेल व्यवसायिकांकडून दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे.

यामुळे गॅसच्या किंमतीत वाढ

मे-जूनपासून सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. याचं कारण म्हणजे चीन आणि अमेरिका यांमधील व्यापारी संघर्ष आणि याचाच परिणाम जागतिक कमोडीटी बाजारावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतींवर परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून भारतात गॅस महागला आहे


हेही वाचा

नव्यावर्षात 'या' इमारतींच्या बांधकामाला होणार सुरूवात

२०१९ मध्ये परिवहन विभागानं घेतले 'हे' महत्वाचे निर्णय

पुढील बातमी
इतर बातम्या