Advertisement

नव्यावर्षात 'या' इमारतींच्या बांधकामाला होणार सुरूवात


नव्यावर्षात 'या' इमारतींच्या बांधकामाला होणार सुरूवात
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ प्रकल्पामुळं अनेक इमारतींच्या कामाला सुरवात झाली नव्हती. परंतु, प्रकल्पबाधित होत असलेल्या रहिवाशांसाठी नव्या वर्षात खूशखबर आहे. प्रकल्पबाधितांसाठी उभारण्यात येणाऱ्या नव्या इमारतींच्या बांधकामाला जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मेट्रो प्रकल्पासाठी गिरगाव व काळबादेवीतील काही जुन्या चाळी पाडण्यात आल्या आहेत. त्यातील कुटुंबांचं अन्यत्र स्थलांतर करण्यात आलं आहे.

म्हाडा वसाहतीत पुनर्वसन

काही जणांचं जवळच्या म्हाडा वसाहतीत पुनर्वसन करण्यात आलं आहे. काहींनी अन्यत्र आपली सोय केली. त्यासाठी त्यांना रोख भाडे देण्यात आले असून, प्रकल्पाच्या आड येणारी या भागातील शेवटची चाळ ४ महिन्यांपूर्वी पाडण्यात आली. सुरुवातीला स्थानिकांनी अन्यत्र स्थलांतर करण्यास विरोध दर्शवला होता. अनेक राजकीय पक्षांनी प्रकल्पबाधितांची बाजू घेतली होती. स्थानिकांसह राजकीय पक्षांनी उग्र आंदोलने केली होती. त्यामुळं या भागात प्रकल्प रेंगाळला. अखेर तत्कालीन राज्य सरकारला वादात मध्यस्थी करावी लागली.

आकर्षक पॅकेज

राज्य सरकारकडून प्रकल्पबाधितांसाठी आकर्षक पॅकेज तयार करण्यात आलं. वास्तविक पाहता, एखाद्या प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या प्रकल्पबाधितांसाठी २५० चौरस फुटाचं घर देण्यात येते. गिरगाव व काळबादेवी येथील प्रकल्पग्रस्तांसाठी दुप्पट आकाराची घरे देण्याची योजना तयार करण्यात आली. प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वी जिथे चाळी होत्या, त्याच ठिकाणी नव्या इमारती बांधून देण्याचं आश्वासन देण्यात आले.हेही वाचा -

31st Party: प्रवाशांना दिलासा; 'परे' व 'मरे' सज्ज

New Year: नववर्ष स्वागतासाठी बेस्टची अतिरिक्त बससेवासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा