'त्या' जाहिरातीमुळं अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं चित्रपटांमध्ये साकारलेल्या विविध भूमिकेनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. तसंच, गतवर्षाचा बॉक्स ऑफिस किंग देखील अक्षय कुमार ठरला आहे. परंतु, आता अक्षय एका जाहीरातीमुळं वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. निरमा पावडरच्या जाहिरातीमुळं अभिनेता अक्षय कुमार हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'निरमाची ही जाहिरात करुन अक्षय कुमारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे', असा आरोप आता त्याच्यावर होतो आहे.

'अशी' आहे जाहिरात

निरमा पावडरच्या या जाहिरातीत अक्षय कुमार आणि इतर मावळे लढाई करुन दरबारात परतात. त्यावेळी सुवासिनी त्यांचं औक्षण करतात. एक महिला मात्र त्यांच्या युद्धात मळलेल्या, खराब झालेल्या कपड्यांवर भाष्य करते आणि हे कपडे तर आम्हालाच धुवावे लागतील असं म्हणते. त्यावेळी अक्षय कुमार म्हणतो, 'महाराज की सेना दुश्मनोंको धोना जानती हैं और अपने कपडे भी!’ आणि त्यानंतर अक्षय कुमार आणि त्याच्यासह सगळे मावळे कपडे धुताना दाखवण्यात आले आहेत.

माफीची मागणी

या जाहिरातीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात येत असून, याप्रकरणी अभिनेता अक्षय कुमारनं माफी मागावी अशी मागणी आता शिवप्रेमी करत आहेत. तसंच, अक्षय तसं न केल्यास त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.


हेही वाचा -

जेएनयू हिंसाचार : गेट वेवरील आंदोलकांची आझाद मैदानात रवानगी

मुंबई, मध्य महाराष्ट्रातील तापमानात वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या