मुंबई, मध्य महाराष्ट्रातील तापमानात वाढ

मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील तापमानात वाढ झाली आहे.

SHARE

मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली असून, गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात गारठा पसरला होता. मात्र, रविवारपासून तापमानात वाढ झाली आहे. अस असलं तरी, ८ आणि ९ जानेवारीनंतर तापमानात घट होण्याची शक्यता आहे. या अशा बदलत्या वातावरणामुळं मुंबईकरांच्या आरोग्यात बिघाड होत अाहेत.

कमाल तापमान

मुंबईसह किनारपट्टीवर सर्वत्र कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्यावर वर राहिलं, तर किमान तापमान २० अंशावर गेलं. मुंबईच्या किमान तापमानात तीन अंशानी वाढ होऊन ते २०.५ अंश सेल्सिअसवर पोहोचलं, तर कमाल तापमानात २.४ अंशांची वाढ होऊन ३४.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आलं. त्यामुळं सोमवारी मुंबईकरांची गुलाबी थंडी जाऊन पुन्हा घामाच्या धारा लागल्या.

तापमानात घट

मध्य महाराष्ट्रातदेखील कमाल तापमानात वाढ झाली आहे. तसंच, सर्वत्र २६ ते ३० अंश, तर किमान तापमान १३ ते १९ अंशांवर राहिलं. हवामान विभागाच्या अनुमानानुसार ८ आणि ९ जानेवारीनंतर मुंबई आणि परिसरातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे.हेही वाचा -

जेएनयू हिंसाचार : गेट वेवरील आंदोलकांची आझाद मैदानात रवानगी

IRCTC ची नवी योजना ‘बुक नाउ-पे लेटर’संबंधित विषय
ताज्या बातम्या