इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझ्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)
आपल्या ग्राहकांसाठी अनेक सेवा सुरू करत असते. आयआरसीटीसी द्वारे तिकिट बुक करताना कोणत्याच प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत. एक मिनिटं, असं समजू नका की पैसेच द्यावे लागत नाहीत. तिकिटाचे पैसे तुम्ही नंतर दिले तरी चालतात.
आयआरसीटीसीच्या या सेवेचे नाव ‘बुक नाउ-पे लेटर’ असं आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या ई-पेय लेटर पर्यायावरून तिकिट बुक करता येते. ही सुविधा रिझर्व्ह आणि तत्काळ दोन्हींसाठी उपलब्ध आहे.
आरआरसीटीसीच्या वेबसाइटवर लॉगिन केल्यानंतर तिकिट बुक करण्यासाठी आपल्या प्रवासाची माहिती द्या. जेव्हा तुम्ही पेमेंटच्या पेजवर जाल, तेव्हा तुम्हाला पे लेटर हा पर्याय दिसेल. तुम्ही हा पर्याय निवडल्यानंतर तुम्ही थेट इ-पे लेटर वेबसाइटवर जाल. यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ओटीपीद्वारे इ-पे लेटरवर लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यावर तिकिट बुकिंगची रक्कम निश्चित करावी लागेल.
इ-पे लेटर वेबसाइटवर तिकिट बुक केल्यानंतर तुम्हाला १४ दिवसांची मुदत मिळेल. जर प्रवाशांनी १४ दिवसांच्या आत पैसे जमा केले नाही तर ३.५ टक्के व्याज आणि सोबत कर द्यावा लागतो. याशिवाय तुमचे क्रेडिट कमी केले जातात. यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही आयआरसीटीसीच्या या सेवेचा फायदा घेऊ शकणार नाही.
हेही वाचा