Advertisement

मध्य रेल्वेवरील अपघाती मृत्यूंच्या प्रमाणाात घट

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या २०१९ मध्ये ११.८२ टक्क्यांनी कमी झाली आहे.

मध्य रेल्वेवरील अपघाती मृत्यूंच्या प्रमाणाात घट
SHARES

मुंबईची लाइफलाइन ही अनेकदा प्रवाशांसाठी डेथलाइन ठरली आहे. तर कधी त्या लाइफलाइन टाईमलाइनचं राहिलं नव्हतं. वेळापत्रकानुसार लोकल धावत नसल्यानं प्रवाशांची लोकलला गर्दी होते. परिणामी अपघात होत असून, अनेकांना जीव गमवावा लागतो. परंतु, मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई विभागात अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या २०१८ सालच्या तुलनेत २०१९ मध्ये ११.८२ टक्क्यांनी कमी झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावर जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ मध्ये वेगवेगळ्या अपघातांत १ हजार २५१ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २०१८ मध्ये १ हजार ४१४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते.

जनजागृती कार्यक्रम

मध्य रेल्वे प्रशासनातर्फे अपघात कमी करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम मागील वर्षभरात राबविण्यात आले होते. या सुरू असलेल्या उपाययोजनांमुळं लोकल अपघातांत मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचं समजतं. यावेळी रेल्वे रुळांच्या शेजारी संरक्षक भिंत उभारण्यावर भर देण्यात आला. सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते मानखुर्द यादरम्यान संरक्षक भिंत बांधली आहे. १३० किमीपैकी ११३.१५ किमी रेल्वे रुळांवर दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे.

संरक्षक भिंतीचं काम

मागील वर्षात १७.२५ किलोमीटर संरक्षक भिंतीचं काम करण्यात आलं असून २७.५ किलोमीटरचं काम सुरू आहे. यासह अतिरिक्त २६.५ किमी लांबीची संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्ताव आहे. मध्य रेल्वे मार्गावर मागील ५ वर्षांत ७९ पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. २४ पादचारी पुलांचं बांधकाम सुरू आहे. विविध रेल्वे स्थानकांवर ७६ सरकते जिने आणि ४० लिफ्ट बसविण्यात आल्या. आणखी १०१ सरकते जिने आणि ६५ लिफ्टचा प्रस्ताव आहे.



हेही वाचा -

भाऊचा धक्का ते मांडवा प्रवास केवळ ४५ मिनिटांत

मुंबईतील 'हे' परिसर सर्वाधिक प्रदूषित



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा