Advertisement

भाऊचा धक्का ते मांडवा प्रवास केवळ ४५ मिनिटांत


भाऊचा धक्का ते मांडवा प्रवास केवळ ४५ मिनिटांत
SHARES

मुंबई, ठाणे, नवी मुंबईपर्यंत जाण्यासाठी प्रवाशी बस, टॅक्सी अथवा अन्य वाहनांचा पर्याय निवडतात. परंतु, वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळं वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळं तासंतास प्रवाशांचा खोळंबा होतो. त्यामुळं याला पर्याय म्हणून सरकारकडून जलवाहतुकीचा पर्याय निवडला जात आहे. त्यानुसार, प्रवाशांना भाऊचा धक्का ते मांडवा असा सागरी प्रवास ४५ मिनिटांत करता येणार आहे.

सागरी प्रवास

मागील २ वर्षे रखडलेला भाऊचा धक्का ते मांडवा असा ४५ मिनिटांचा सागरी प्रवास येत्या २६ जानेवारीपासून प्रत्यक्षात येणार आहे. ५०० प्रवासी, पर्यटकांची क्षमता आणि वाहने घेऊन जाणारं भलंमोठं जहाज २६ जानेवारीला सेवेत येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डानं दिली.

रो पॅक्स सेवा

सध्या गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग, मांडवा, एलिफंटा अशा फेरी बोटसह सेवा पर्यटक व स्थानिकांसाठी आहेत. मात्र प्रवासी, पर्यटकांबरोबरच मोठ्या संख्येनं वाहनं घेऊन जाणारी जहाज सेवा (रो पॅक्स सेवा)सध्या नाही. अशी सुविधा देण्यासाठी प्रयत्न होत असतानाच अनेक तांत्रिक कारणांस्तव ती वेळेत येऊ शकली नाही.

वॉटर टॅक्सीची सुविधा

वॉटर टॅक्सीची सुविधा सुरू करण्याचा विचार असला तरी त्याआधी भाऊचा धक्का ते मांडवा अशी प्रवासी आणि वाहनं घेऊन जाणारी जलवाहतूक सेवा (रो पॅक्स)सुरू केली जाणार आहे. यासाठी ग्रीस देशातून भलंमोठं जहाज मुंबईत २२ जानेवारीपर्यंत येणार आहे. त्यानंतर २६ जानेवारीला याची सेवा देण्यात येणार आहे. या सेवेमुळे भाऊचा धक्का ते मांडवा प्रवास ४५ मिनिटांत होणं शक्य होणार आहे.

भाडे दरावर चर्चा

या जहाजातून ५०० प्रवासी, पर्यटक प्रवास करू शकणार आहेत. यामध्ये दुचाकी, चार चाकींसोबतच बस, ट्रकसारखी २०० वाहनं घेऊन जाता येणं शक्य होणार आहे. या सेवेच्या प्रवास भाडे दरावर अद्याप चर्चा सुरू आहे. भाऊचा धक्का ते नेरुळसाठीही अशाच प्रकारची जलवाहतूक सेवा ६ महिन्यांनंतर सुरू करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

मुंबईतील 'हे' परिसर सर्वाधिक प्रदूषित

जाचक अटींच्या पल्याड शिवभोजनाची ताटी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा