Advertisement

जाचक अटींच्या पल्याड शिवभोजनाची ताटी

महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना १० रुपयांमध्ये शिवभोजन देण्याचा शासन निर्णय नुकताच महाविकास आघाडी सरकारने काढला. या निर्णयाकडे बघून हसावं की रडावं अशी अवस्था सर्वसामान्यांची झाली आहे.

जाचक अटींच्या पल्याड शिवभोजनाची ताटी
SHARES

महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना १० रुपयांमध्ये शिवभोजन देण्याचा शासन निर्णय नुकताच महाविकास आघाडी सरकारने काढला. या निर्णयाकडे बघून हसावं की रडावं अशी अवस्था सर्वसामान्यांची झाली आहे. कारण प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणारी ही थाळी जिल्हानिहाय जास्तीत १५०० तर कमीत कमी १५० लोकांनाच ही थाळी खाता येणार आहे.

शिवभोजन योजनेअंतर्गत १० रुपयांच्या थाळीची वर्गवारी राज्य सरकारने शासन निर्णय काढून जाहीर केली आहे. या वर्गवारीनुसार १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राला दरदिवशी फक्त १८००० थाळ्याच मिळणार आहेत. या थाळ्यांनी नेमकी कुणाची भूक भागणार असा प्रश्न उपस्थि होत आहे.

हेही वाचा- पुढच्या २ वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण करणार- अजित पवार

शिवभोजन योजनेत थाळ्यांच्या संख्येप्रमाणे जेवणाच्या प्रमाणावरही बंधन घालण्यात आलं आहे. दुपारी १२ ते २ या वेळेतच ही शिवभोजन थाळी उपलब्ध होणार आहे. या थाळीत फक्त २ चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी डाळ आणि भात मिळणार आहे. प्रायोगिक तत्वावरील या याेजनेसाठी ३ महिन्यांसाठी ६ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

  • जेवण दुपारी १२ ते २ याच कालावधीत उपलब्ध असेल.
  • प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला जास्तीत जास्त १५०० जणांनाच जेवण मिळेल
  • जेवणात ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम वरण व दीडशे ग्रॅम भात मिळेल.
  • शिवभोजनालय चालवण्यासाठी संबंधिताकडं स्वत:ची पुरेशी जागा असावी.
  • भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल

हेही वाचा- ‘ती’ अनलकी केबिन एकाही मंत्र्याने का नाही घेतली?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा