Advertisement

‘ती’ अनलकी केबिन एकाही मंत्र्याने का नाही घेतली?

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटप शिल्लक असलं, तरी सर्व मंत्र्यांना मंत्रालयातील केबिनचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्र्यांना त्यांच्या आवडीनुसार केबिन देण्यात येत असली, तरी एक केबिन मात्र तुलनेने कमनशिबी ठरत आहे.

‘ती’ अनलकी केबिन एकाही मंत्र्याने का नाही घेतली?
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार तब्बल महिन्याभराने करण्यात आला. या नंतर प्रशासनाकडून नवनियुक्त मंत्र्यांना केबिन आणि बंगल्यांचंही वाटप करण्यात आलं. परंतु ‘ती’ केबिन अनलकी असल्याचं म्हणत कुणीही घेण्याची तयारी दाखवलेली नाही. 

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटप शिल्लक असलं, तरी सर्व मंत्र्यांना मंत्रालयातील केबिनचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्र्यांना त्यांच्या आवडीनुसार केबिन देण्यात येत असली, तरी एक केबिन मात्र तुलनेने कमनशिबी ठरत आहे. 

हेही वाचा- अजितदादांना मिळाला पसंतीचा 'हा' बंगला, मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप

ही केबिन आहे ६०२ क्रमांकाची केबिन. ही केबिन मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असून ती अनलकी समजली जात आहे. या केबिनमध्ये सुरूवातीला मुख्यमंत्री, मुख्य सचिव बसत होते. त्यानंतर ही केबिन एकनाथ खडसे यांना देण्यात आली. परंतु २ वर्षांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना ही केबिन देण्यात आली. परंतु त्यांचा २ वर्षांनी हृदयविकाराने मृत्यू झाला. तेव्हापासून ही केबिन अनलकी म्हणून कुणीही घेतलेली नाही. 

नव्या सरकारमधील मंत्रीही ही केबिन घेण्याकडे टाळाटाळ करत आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचरलं असता, ते म्हणाले की पवार कुटुंबीय अंधश्रद्धा मानत नाही. त्यामुळे अशुभ केबिन नाकारली असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. केबिनचं वाटप ज्येष्ठतेनुसार झालं आहे. चार-पाच मंत्र्यांना विधानभवनातून काम करावं लागणार आहे. केबिनप्रमाणेच बंगल्याचं वाटपही ज्येष्ठतेनुसार झाल्याचं त्यांनी सांगितलं.  

हेही वाचा- पुढच्या २ वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण करणार- अजित पवार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा