Advertisement

राज्यात लवकरच ५० शिवभोजन केंद्रावर १० रुपयात जेवण

जानेवारीपासून राज्यात ५० शिवभोजन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे गोरगरिबांना दहा रुपयांत थाळी मिळेलच. पण अनेक हातांना रोजगारही मिळणार

राज्यात लवकरच ५० शिवभोजन केंद्रावर १० रुपयात जेवण
SHARES

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेने वचननाम्यात दहा रुपयात पोटभर जेवणाची थाळी देण्याची घोषणा केली होती. या घोषणेवर विरोधकांची सडकून टीकाही केली. मात्र नुकतंच महाविकासआघाडीकडून राज्यात ५० शिवभोजन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला १० रुपयांमध्ये सकस आणि परवडणारे 'शिवभोजन'  देण्याची महत्वाची घोषणा महाराष्ट्र विकास आघाडीने केली आहे.

शिवभोजन योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथील अधिवेशणात केली.  त्यानुसार सुरवातीला प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी 'शिवभोजन' केंद्रे सुरू करणार असून त्यातून येणाऱ्या त्रुटी आणि सूचना लक्षात घेतले जाणार आहेत. याबाबत महाराष्ट्र विकास आघाडीकडून शिक्कामोर्तब झाले आहे. जानेवारीपासून राज्यात ५० शिवभोजन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे गोरगरिबांना दहा रुपयांत थाळी मिळेलच. पण अनेक हातांना रोजगारही मिळणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले होते.

 झुणका भाकर केंद्र योजना जशी होती, त्या धर्तीवर ही योजना असेल, असे अरविंद सावंत यांनी सांगितले. मात्र शिवसेना-भाजपची ही झुणका भाकर केंद्र योजना कॉंग्रेस सत्तेवर आल्यावर त्यांनी बंद करून टाकली होती. त्यातच आता नव्याने सुरू होणाऱ्या शिवभोजन योजना सुरू करण्यासाठी लागणारा पैसा, त्यासाठी लागणारी जागा, या प्रश्नांमुळे ही योजना कितपत राज्यात टिकेल हे सांगणे ही कठिण आहे.  याआधी तामिळनाडूमध्ये 'अम्मा कँटिन' सुरु झाले होते. मात्र त्यातील ९९ टक्के केंद्रे आर्थिक परिस्थितीमुळे बंद पडली. त्यामुळे आता 'शिवभोजन'साठी पैसा उभे करणे हे सरकारचे महत्वाचे काम आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा