Advertisement

मुंबईतील 'हे' परिसर सर्वाधिक प्रदूषित

मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्यानं हवा बिघडली आहे.

मुंबईतील 'हे' परिसर सर्वाधिक प्रदूषित
SHARES

मुंबईतील हवा गुरूवारी पुन्हा बिघडल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्यानं बिघडली आहे. बीकेसी, अंधेरी आणि बोरीवली या परिसरातील हवेची नोंद सर्वाधिक प्रदूषित असल्याची नोंद सफरनं केली आहे. प्रदूषित वातावरणामुळं आजारात वाढ होत आहे. दरम्यान, मुंबई प्रदूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मुंबईचा स्वच्छ हवा कृती आराखडा तयार केला आहे. केंद्र सरकारनं हा आराखडा २ वेळा फेटाळत तिसऱ्यांदा स्वीकारला आहे. मंडळाचा हा आराखडा ठोस, परिपूर्ण नसल्याची टीका पर्यावरणतज्ज्ञांनी केली आहे.

५ हजार रुपये दंड

बीकेसीमधील प्रदूषणास जे घटक कारणीभूत ठरतील, त्यांना ५ हजार रुपये दंड ठोठाविण्यात येणार असल्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं घेतला आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेनेदेखील कार्यवाही करणे गरजेचे आहे, असे मत पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी नोंदविले आहे.

सर्वाधिक प्रदूषित क्षेत्र

बोरीवली, अंधेरी, बीकेसी, चेंबूर, वरळी आणि माझगाव हे परिसर सातत्यानं प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. या आठवड्यात बीकेसी सर्वाधिक प्रदूषित क्षेत्र म्हणून नोंदविण्यात आलं असून, इथं सुरू असलेली बांधकामं यास कारणीभूत असल्याचं पर्यावरणतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हवेचा दर्जा

‘सफर’ या संकेतस्थळावर हवेचा दर्जा नोंदविण्यात येतो. डिसेंबरमध्ये २३ दिवस बीकेसीमधील हवेचा दर्जा अत्यंत खालावला होता. १ ते २२ डिसेंबरदरम्यान मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचं प्रमाण २ वेळा २०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आलं. बीकेसीमधील सूक्ष्म प्रदूषक कणांचं प्रमाण १७ वेळा २०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आलं आणि ३ वेळा ३०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आलं.

पार्टिक्युलेट मॅटर (पीएम)

  • बोरीवली ३०५ अत्यंत वाईट
  • मालाड २९१ वाईट
  • भांडुप १३२ मध्यम
  • अंधेरी ३०३ अत्यंत वाईट
  • बीकेसी ३०६ अत्यंत वाईट
  • चेंबूर २२८ वाईट
  • वरळी २४७ वाईट
  • माझगाव २३५ वाईट
  • कुलाबा १३५ मध्यम
  • नवी मुंबई २४९ वाईटहेही वाचा -

दादर स्थानकात अस्वच्छता, कामगारांचं 'सफाई काम बंद'

खडसेंचे आरोप निराधार- गिरीश महाजनRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा