Advertisement

दादर स्थानकात अस्वच्छता, कामगारांचं 'सफाई बंद' आंदोलन

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात अस्वच्छता पसरण्याची शक्यता आहे.

दादर स्थानकात अस्वच्छता, कामगारांचं 'सफाई बंद' आंदोलन
SHARES

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात अस्वच्छता पसरण्याची शक्यता आहे. कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठविण्यासाठी कामगारांनी दादर स्थानकात सफाई काम बंद केलं आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत चार कामगारांना कामावर रूजू न केल्यास शुक्रवारी मध्य रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून देण्यात आला होता.

४ कंत्राटी

दादर स्थानकातील ४ कंत्राटी कामगारांचं कंत्राट बुधवारी संपलं. त्यानंतर नवीन कंत्राटामध्ये त्यांना कोणतीही माहिती न देता कामावरून कमी करण्यात आलं. इतर कामगारांनी याबाबत विचारणा केली असता, कामावरून काढण्यात येइल, असं त्यांनाही वरिष्ठांकडून धमकाविण्यात आल्याचं समजतं. त्यामुळं कामगारांनी दादर स्थानकात सफाई काम बंद केले आहे.

९३ कंत्राटी सफाई

दादर स्थानकात ९३ कंत्राटी सफाई कामगार आहेत. अनेक वर्षांपासून कंत्राटावर काम करत आहेत. मात्र, नवीन वर्षात दादर स्थानकातील सफाई कामगारांचं कंत्राट संपल्यानं २ जानेवारी रोजी नवीन कंत्राटदाराची नेमणूक झाली. या नवीन कंत्राटदारानं ४ कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याची माहिती मिळते.

सफाई काम बंद

४ कामगारांच्या हक्कांसाठी दादर स्थानकात गुरुवारी सायंकाळपासून सफाई काम बंद करण्यात आले आहे. संघटित व असंघटित कामगारांचा यात समावेश आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत कामगारांना कामावर रुजू केले नाही तर, शुक्रवारी मध्य रेल्वे मार्गावर सफाई काम बंद आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा कामगार संघटनेकडून देण्यात आला होता.



हेही वाचा -

मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं

अटी बघूनच भूक मरेल, शिवभोजन योजनेवर नीलेश राणेंची टीका



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा