Advertisement

मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं


मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं
SHARES

आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा खंडीत झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. लेव्हल क्रॉसिंग करत असताना एका डंबरनं रेल्वे गेटला धडक दिल्यानं ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा खंडीत झाल्यानं काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वेच्या अधिकाऱ्या तातडीनं घटनास्थळी धाव घेत ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचं काम पूर्ण केलं. त्यानंतर ही वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

दुरुस्तीचं काम

शुक्रवारी सकाळी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तातडीनं ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचं काम हाती घेत ते दुरुस्त करण्यात आलं. मात्र, तरीही अद्याप मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे. तब्बल पाऊणतास उशिरानं होत असल्याचं माहिती मिळते.

या गाड्यांवर परिणाम

या घटनेचा परिणाम लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांवर देखील झाला. दरम्यानच्या काळात मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी, पंजाब मेल अशा गाड्या खोळंबल्या होत्या. ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी रेल्वेनं अर्धा तासाचा ब्लॉक घेतला होता.



हेही वाचा -

अटी बघूनच भूक मरेल, शिवभोजन योजनेवर नीलेश राणेंची टीका

पेहचान कौन? 'लुडो' चित्रपटातल्या या भूमिकेची होतेय चर्चा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा