Advertisement

अटी बघूनच भूक मरेल, शिवभोजन योजनेवर नीलेश राणेंची टीका

ठाकरे सरकारने दिलेल्या वचनानुसार १० रुपयांत शिवभोजन थाळीची योजना मंजूर केली असली, तरी त्यावर लादण्यात आलेल्या अटींमुळे ही योजना विरोधकांच्या टीकेचं लक्ष्य ठरली आहे.

अटी बघूनच भूक मरेल, शिवभोजन योजनेवर नीलेश राणेंची टीका
SHARES

ठाकरे सरकारने दिलेल्या वचनानुसार १० रुपयांत शिवभोजन थाळीची योजना मंजूर केली असली, तरी त्यावर लादण्यात आलेल्या अटींमुळे ही योजना विरोधकांच्या टीकेचं लक्ष्य ठरली आहे. अटी बघूनच भूक मरेल, अशी ही शिवभोजन योजना असल्याची टीका भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केली आहे.

हेही वाचा- जाचक अटींच्या पल्याड शिवभोजनाची ताटी

राज्यातील गोरगरीब जनतेला १० रुपयांत पोटभर सकस जेवण देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीआधी केली होती. शिवाय शिवसेनेच्या वचननाम्यातही मतदारांना १० रुपयांत सकस अन्न देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर शिवभोजन थाळी योजनेला गती मिळाली. मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी देतानाच ३ महिन्यांसाठी ६ कोटी ८० लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली.

परंतु या योजनेचा लाभ सरसकट सर्वांना घेता येणार नसल्याने गोरगरीबांकडून या योजनेवर नाराजी दर्शवण्यात येत आहे. ही योजना राज्यात मोजक्याच ठिकाणी दुपारी १२ ते २ या वेळेत उपलब्ध होईल. योजनेनुसार प्रत्येक जिल्ह्याला १५० ते १५०० थाळ्याच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. थाळीतील अन्नपदार्थही मोजक्याच प्रमाणात मिळणार आहे. 

हेही वाचा- ‘ती’ अनलकी केबिन एकाही मंत्र्याने का नाही घेतली?

या अटीशर्थींवरून नीलेश राणे यांनी ट्विटरवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 'शिवभोजन योजनेतील अटी बघूनच माणसाची भूक मरेल. शिवभोजन नाव बदलून अटीभोजन करा, असं त्यांनी सुचवलं आहे. सरळ हातानं काही मिळेल अशी अपेक्षा या सरकारकडून कुणी करू नये,' असा संतापही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा