माजी नगरसेवक विनोद शेखर यांचे निधन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद शेखर यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मंगळवारी संध्याकाळी बॉम्बे रुग्णालयात त्यांचे निधन झाले. माजी आमदार अनी शेखर यांचे पुत्र होत. ते 58 वर्षांचे होते.

कुलाब्यातील माजी आमदार अॅनी शेखर यांचे पुत्र असलेल्या विनोद शेखर हे सन 2002 व 2007 मध्ये नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर हा मतदार संघ महिला आरक्षित झाल्यानंतर 2012 मध्ये काँग्रेसच्या उमेदवार सुषमा साळुंखे या विजयी झाल्या होत्या. विनोद शेखर यांनी सुखमा साळुंखेला आपल्या विभागातून निवडून आणले होते. त्यानंतर विनोद शेखर हे नगरसेविका सुषमा साळुखे यांच्यासोबत विवाहबद्ध झाले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांना पुत्र रत्नाचा लाभ झाला होता.

मुंबई महापालिकेत विविध ठरावांच्या सूचना मांडून महापालिकेच्या कारभारात अमुलाग्र बदल आणण्याचा प्रयत्न विनोद शेखर यांनी केला होता. मागील विधानसभा निवडणुकीत कुलाबा मतदार संघातून अॅनी शेखर यांचा पराभव झाला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही विनोद शेखर यांचा पराभव झाला होता.

पत्रकारांचा मित्र

मंगळवारी विनोद शेखर यांचे निधन झाले. परंतु हा दिवस मुंबईकरांना 26 जुलैच्या महापुराची आठवण करून देणारा होता. 26 जुलैला मुंबईत महाप्रलंय आल्यानंतर महापालिकेचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी विनोद शेखर यांनी स्वत: जातीने जेवण पाठवून दिले. एका बाजुला त्यादिवशी लोकांना काहीही खायला मिळत नव्हते, परंतु विनोद शेखर यांनी या पत्रकारांसाठी जेवणाची व्यवस्था केली. त्यामुळे पत्रकारांचा मित्र म्हणूनच त्यांची एक ओळख होती. नेमक्या मंगळवारच्या दिवशी त्यांच्या निधनाची बातमी सर्वांना धक्का देणारी ठरली आहे.


हेही वाचा - 

नोटबंदीविरोधात काँगेसनं राबवलं स्वाक्षरी अभियान

संत सेवालाल महाराजांसाठी धरणे आंदोलन


पुढील बातमी
इतर बातम्या