वाशीच्या रघुलीला मॉलध्ये सिलिंगचा भाग कोसळला

वाशीतील प्रसिद्ध रघुलीला मॉलच्या सिलिंगचा भाग गुरूवारी दुपारी अचानक कोसळला. दुपारच्या वेळेस माॅलमध्ये फारशी गर्दी नसल्याने सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही. परंतु, या दुर्घटनेमुळे माॅलमधील दुकानदार आणि उपस्थित चांगलेच घाबरून गेले.

कधी घडली घटना?

नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकानीजक रघुलीला माॅल आहे. मंगळवारी दुपारी १२.२५ वाजेच्या सुमारास मॉलमधील सिलिंगचा भाग अचानक खाली कोसळला. त्यातला बराचसा भाग सरकत्या जीन्यावर आणि माॅलच्या मध्यभागी पडला.

अनर्थ टळला

सुदैवाने यावेळेस माॅलमध्ये फारशी गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना घडल्यावर सुरक्षा रक्षकांनी मॉलमधील लोकांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्वरीत बाहेर काढलं, तर उर्वरीत लोकांना दुकानामध्येच थांबण्यास सांगितलं.

दुरूस्तीसाठी बंद

वाशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे तिसऱ्या मजल्यावर संपणाऱ्या सिलिंगचा प्लास्टर आॅफ पॅरिसचा काही भाग नरम होऊ खाली कोसळल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. परंतु चौकशीतूनच दुर्घटनेचं खरं कारण कळेल. सध्या तरी दुरूस्ती पूर्ण होईपर्यंत माॅल पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.


हेही वाचा-

लोअर परळ पूल बंद, प्रवासी हैराण

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी नेमला तिसरा सल्लागार


पुढील बातमी
इतर बातम्या