Advertisement

लोअर परळ पूल बंद, प्रवासी हैराण

लोअर परळ पूल वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी 24 जुलैपासून दुरुस्ती होईपर्यंत बंद राहणार असल्याचं पश्चिम रेल्वेने जाहीर केलं. मात्र हा पूल बंद असल्याची अनेकांना कल्पना नसल्यानं या परिसरात नागरिकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

लोअर परळ पूल बंद, प्रवासी हैराण
SHARES

अंधेरी येथील गोखले पूल दुर्घटनेनंतर जागं झालेल्या पश्चिम रेल्वेने पुलांच्या आणि दुरुस्ती देखभालीसाठी कंबर कसली आहे. त्यानुसार पुलांची पाहणी केली असता लोअर परळचा पूल धोकादायक आढळून आला. त्यामुळे हा पूल वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी 24 जुलैपासून दुरुस्ती होईपर्यंत बंद राहणार असल्याचं पश्चिम रेल्वेने जाहीर केलं. मात्र हा पूल बंद असल्याची अनेकांना कल्पना नसल्यानं या परिसरात नागरिकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.



उपाययोजना आवश्यक

अंधेरी दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने पाहणींचा सपाटा लावला. या पाहणीत लोअर परळसह एकूण सहा उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची गरज असल्याचं आढळून आलं. सध्या लोअर परळ स्थानकासमोरील ना. म. जोशी मार्ग पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात झालेल्या गर्दीने हैराण प्रवाशांनी पोलिस आणि रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं आहे.


गर्दीमुळे प्रवासी त्रस्त

लोअर परळ परिसरात अनेक कॉर्पोरेट ऑफिस आहेत. त्यामुळे या ठिकाणी सकाळी ९ ते १० च्या सुमारास नोकरदार वर्गाची गर्दी असते. मात्र मंगळवारी 24 जुलैपासून हा पूल बंद असेल याची कल्पना नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. 

हा पूल मंगळवारपासून बंद करण्यात येणार होतं, मग सोमवारी रात्रीच येथे पोलिस, महापालिका आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था करण्याची गरज होती. ज्याप्रमाणे एल्फिन्स्टन पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली होती. तशी चेंगराचेंगरी या पुलावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची गरज होती.

- स्वरिता पाटकर, सामाजिक कार्यकर्त्या


हेही वाचा -

'लोअर परळचा पूल बंद करा', आयआयटी मुंबईचा 'परे'ला सल्ला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा