Advertisement

'लोअर परळचा पूल बंद करा', आयआयटी मुंबईचा 'परे'ला सल्ला


'लोअर परळचा पूल बंद करा', आयआयटी मुंबईचा 'परे'ला सल्ला
SHARES

अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला पुलांच्या दुरुस्ती आणि देखभालीचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिले होते. रेल्वे मंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबईतील 445 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरू करण्यात आलं. दरम्यान 17 जुलै 2018 रोजी लोअर परळच्या पुलाची तपासणी केली. यानंतर आयआयटी मुंबईने आपला प्राथमिक अहवाल सादर करत लोअर परळचा पूल लगेच बंद करण्यात यावा, असा सल्ला पश्चिम रेल्वेला दिला.


97 वर्ष जुना पूल

लोअर परळचा पूल 1921 मध्ये बांधण्यात आला होता. त्याची लांबी 62.72 मीटर आणि रुंदी 23.20 मी. असून आयआयटीने तपासणीदरम्यान हा पूल अतिशय जीर्ण झाला असल्याचं सांगितलं. त्याचं आडवं खांब गंजलं असून ते त्वरीत बदलणं आवश्यक असल्याचंही निरीक्षण आयआयटीनं नोंदवलं. त्यानुसार आता या पुलाची पुनर्बांधणी करण्यात यावी, अशा आशयाचं पत्र पश्चिम रेल्वेकडून महापालिकेला पाठवण्यात आलं आहे. त्यावर महापालिकेने रेल्वेला त्यांच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या पुलांची दुरुस्ती सुरू करावी, असं सांगितलं. त्यावर प. रेल्वेने पुन्हा पालिकेला पत्र पाठवून हॅंकॉक पुलाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी वेळेत या पुलाची पुनर्बांधणी करण्याबाबत सूचवलं आहे.


पुलांचं ऑडिट दोन टप्प्यांमध्ये 

आयआयटी, महापालिका आणि रेल्वे मिळून मुंबईतील पुलांची पाहणी करत आहे. ही पाहणी दोन टप्प्यांमधे होणार असून यामध्ये टॉवर वॅगनच्या मदतीनं रेल्वे अधिकाऱ्यांची एक टीम केवळ रात्रीच्या वेळी पाहणी करणार आहे. दुसऱ्या टीममध्ये आयआयटी, पालिका आणि रेल्वेचे इतर अधिकारी असणार आहे.
आतापर्यंत 29 पुलांची पाहणी करण्यात आली असून त्यापैकी 8 पुलांची पाहणी रेल्व अधिकाऱ्यांच्या पहिल्या टीमकडून करण्यात आली आहे. तर 3 पुलांची पाहणी आयआयटी, रेल्वे आणि पालिकेकडून संयुक्तपणे करण्यात आली. तर अजून 7 पुलांची पाहणी रेल्वे अधिकाऱ्यांच्या टीमकडून करण्यात येत आहे.


हेही वाचा -

हँकॉक पुलाचं काम रेल्वेनेच रोखलं, महापालिकेचा धक्कादायक आरोप

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा