Advertisement

हँकॉक पुलाचं काम रेल्वेनेच रोखलं, महापालिकेचा धक्कादायक आरोप

या पुलाचं बांधकाम महापालिका रेल्वेच्या हद्दीत करत आहे. यासाठी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आलेला आहे. या बांधकामाच्या दृष्टीने पायलिंगचं काम सुरु असताना रेल्वेने ते बंद पाडलं. रेल्वे सेफ्टी कमिशनची एनओसी असल्याशिवाय तुम्हाला काम करता येणार नाही, असं रेल्वेने कळवून काम बंद करण्यास सांगितल्याची कबुली कोरी यांनी दिली.

हँकॉक पुलाचं काम रेल्वेनेच रोखलं, महापालिकेचा धक्कादायक आरोप
SHARES

अंधेरी पुलाची दुघर्टना झाल्यानंतर रेल्वे आणि महापालिकेकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचं काम सुरु असतानाच माझगाव येथील हँकॉक पुलाचं बांधकाम चक्क रेल्वेनं रोखल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या पुलाचा पाया रचण्यासाठी महापालिकेनं खोदकाम सुरू करताच रेल्वेने हे काम बंद पाडलं. रेल्वेने या कामाला हरकत घेतल्यानं अनेक वर्षाँनंतर सुरु झालेलं बांधकामही महापालिकेला थांबवावं लागलं आहे.


कधी पाडला जूना पूल?

माझगाव येथील जुना हँकॉक पूल धोकादायक झाल्याने मध्य रेल्वेने हा पूल वापरण्यास योग्य नसल्याचं सांगितल्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये तो पाडण्यात आला. त्यानंतर या पुलाच्या बांधकामासाठी मागवलेल्या निविदामध्ये काळ्या यादीतील कंत्राटदार जे. कुमार ही कंपनी पात्र ठरली. परंतु याविरोधातील याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिल्यावर हे कंत्राट रद्द करण्यात आलं.


भूमीपूजनावरूनही वाद

महापालिकेने कंत्राट रद्द केल्यानंतर नव्याने निविदा मागवण्यात आली. यामध्ये रेल्वेच्या कामांचा अनुभव असणाऱ्या साई प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली. या पुलाच्या भूमीपूजनावरूनही राजकीय पक्षांमध्ये वादविवाद निर्माण झाले होते. त्यानंतर सुरू झालेल्या कामानंतरच हे काम रेल्वेनं बंद केल्याची माहिती समोर आली आहे.


एनओसी मागितली

महापालिकेच्या पूल विभागाचे प्रमुख अभियंता शितलाप्रसाद कोरी यांनी स्थायी समितीच्या सभेत अंधेरी पूल दुघर्टनेवरून सुरु झालेल्या चर्चेत उत्तर देताना याची कबुली दिली. या पुलाचं बांधकाम महापालिका रेल्वेच्या हद्दीत करत आहे. यासाठी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आलेला आहे. या बांधकामाच्या दृष्टीने पायलिंगचं काम सुरु असताना रेल्वेने ते बंद पाडलं. रेल्वे सेफ्टी कमिशनची एनओसी असल्याशिवाय तुम्हाला काम करता येणार नाही, असं रेल्वेने कळवून काम बंद करण्यास सांगितल्याची कबुली कोरी यांनी दिली.


काम वेळेत कसं होणार?

आतापर्यंत रेल्वेच्या हद्दीत महापालिकेला काम करता येत नव्हतं. परंतु हँकॉक पुलाच्या माध्यमातून रेल्वेच्या हद्दीत महापालिका पहिल्यांदाच काम करत आहे. परंतु रेल्वेनेच हे काम अडवल्याने या पुलाचं काम वेळेत कसं होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या परवानग्या महापालिकेने घेतलेल्या आहेत. प्रत्यक्ष काम सुरु केल्यानंतर रेल्वे सेफ्टी कमिशनची परवानगी आवश्यक असते. तरी देखील हे काम अडकल्याने रेल्वेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.हेही वाचा-

हँकाॅक ब्रिजच्या जागी तात्पुरता पूल बांधा - उच्च न्यायालय

हँकॉक ब्रिजसाठी पालिकेचा पुढाकार, 'मुंबई लाइव्ह'च्या बातमीचा इम्पॅक्टRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा