Advertisement

अंधेरी पूल दुर्घटनेला महापालिका, रेल्वे जबाबदार; चौकशी अहवालात ठपका

अंधेरी दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी चौकशीचे आदेश देत या दुर्घटनेच्या चौकशीसाठी रेल्वेच्या पश्चिम विभागीय मुख्य सुरक्षा आयुक्तांची नियुक्ती केली होती. त्यानुसार चौकशी पूर्ण झाली असून चौकशीचा प्राथमिक अहवाल बुधवारी सादर करण्यात आला. पालिका आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही यंत्रणा दुर्घटनेसाठी कारणीभूत असल्याचं अहवालात स्पष्टपणे नमूद केल्याची माहिती समोर येत आहे.

अंधेरी पूल दुर्घटनेला महापालिका, रेल्वे जबाबदार; चौकशी अहवालात ठपका
SHARES

अंधेरी रेल्वे स्थानकात गोखले पादचारी पूल कोसळण्याची घटना घडली अाणि यात एका महिलेला अापले प्राण गमवावे लागले. या पुलाची जबाबदारी असलेली मुंबई महापालिका अाणि रेल्वे प्रशासन मात्र स्वत:ची जबाबदारी झटकत एकमेकांवर बोटं दाखवत राहिल्या. पण जबाबदारी झटकणाऱ्या या दोन्ही यंत्रणांना अंधेरी पूल दुर्घटनेसाठी जबाबदार धरण्यात अालं अाहे. रेल्वे प्रशासनाचे पश्चिम विभागीय मुख्य सुरक्षा आयुक्तांच्या चौकशी अहवालात या दोन्ही यंत्रणांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

प्राथमिक अहवाल सादर

अंधेरी दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी चौकशीचे आदेश देत या दुर्घटनेच्या चौकशीसाठी रेल्वेच्या पश्चिम विभागीय मुख्य सुरक्षा आयुक्तांची नियुक्ती केली होती. त्यानुसार चौकशी पूर्ण झाली असून चौकशीचा प्राथमिक अहवाल बुधवारी सादर करण्यात आला. पालिका आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही यंत्रणा दुर्घटनेसाठी कारणीभूत असल्याचं अहवालात स्पष्टपणे नमूद केल्याची माहिती समोर येत आहे.

पालिकेनं केली कामं, रेल्वेनं दुर्लक्ष

गोखले पुलाचा लोखंडी भाग गंजला होता तर पादचारी पुलाच्या खालची बाजू झिजली होती. त्यामुळं हा पुल कमकुवत झाला होता. अशा परिस्थितीत पालिकेनं कामं करताना खोदाखोद केली, केबलचं जाळं टाकलं, पेव्हरब्लाॅक आणि वाळूही टाकली. महत्त्वाचं म्हणजे, पालिकेनं ही काम करण्यासाठी रेल्वेची परवानगीही घेतली नाही. रेल्वेनंही या कामाकडे दुर्लक्ष करत कामावर आक्षेप घेतला नाही.

हे अाहे मुख्य कारण

परिणामी, पालिकेच्या अतिरिक्त कामामुळं पुल आणखी कमकुवत झाला. त्यावर अतिरिक्त वाहतुकीचा भार पडून ही दुर्घटना घडली, असं स्पष्टीकरण अहवालात देण्यात आलं आहे. त्यामुळं आता या अहवालानंतर पुढं काय होणार, हेच पाहणं अौत्सुक्याचं ठरेल.हेही  वाचा -

मालमत्तेची कुंडली आता एका क्लिकवर

पहिली प्रवेशाचं वय सहाच राहणार- शिक्षणमंत्री 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा