Advertisement

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी नेमला तिसरा सल्लागार


गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी नेमला तिसरा सल्लागार
SHARES

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम करण्यासाठी आतापर्यंत दोन सल्लागारांची नेमणूक यापूर्वीच करण्यात आली होती. त्यानंतर आता या रस्त्यांवरील प्रमुख चौकांची सुधारणा करण्यासाठी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, पादचारी मार्ग आदींच्या कामांसाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्यात येत आहे. या तांत्रिक सल्लागारासाठी उड्डाणपुलांच्या बांधकामांत तज्ज्ञ असलेल्या टीपीएफ इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीची निवड करण्यात येत आहे.


सल्लागार सेवेसाठी इतकं शुल्क

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं बांधकाम महापालिकेनं हाती घेत या रस्त्यांसाठी दोन वर्षांपूर्वी पेडिको कंपनी लि. यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर आराखडा बनवण्यासाठी पेन्टॅकल कन्सल्टंट (इंडिया) प्रां. लिं ची निवड करण्यात आली. आता या मार्गावरील चौकांवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांच्या कामांसाठी मेसर्स टी.पी.एफ इंजिनिअरींग प्रा. लि. या कंपनीची तांत्रिक सल्लागार म्हणून निवड करण्यात येत आहे. या सल्लागाराच्या माध्यमातून वाहतुकीचं सर्वेक्षण, विश्लेषण आणि त्यावरील उपाययोजना यांचा प्राथमिक अंदाज पूर्ण करण्यात येणार आहे.

या मार्गावरील चार पदरी, एक भूयारी मार्ग, चौकांवरील चार उड्डाणपूल आणि भूयारी मार्ग व उड्डाणपूल बांधण्यासाठी अंदाजे ९१९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या सल्लागार सेवेसाठी ९ कोटी ९० लाख ३१ हजारांचं शुल्क दिलं जाणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा