नव्या महापालिका आयुक्तांनी पदभार स्वीकारला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

प्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून सोमवारी पदभार स्वीकारला. अजोय मेहता यांची राज्य सरकारच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त झालं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त सचिव असलेल्या परदेशी यांची राज्य सरकारने आयुक्त पदासाठी नियुक्ती केली.   

परदेशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात. ठिकठिकाणी सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा देत, मान्सूनपूर्व कामे मार्गी लावण्याचं आव्हान परदेशी यांना पेलायचं आहे. 

नाले सफाई, रस्त्याची अर्धवट कामं, वृक्ष छाटणी, पुलांची डागडुजी, आरोग्य व्यवस्था इत्यादी प्रलंबित कामे पुढच्या काही आठवड्यात पूर्वत्वास न्यायची आहेत. ३१ मे पर्यंत मान्सपूर्व कामे पूर्ण करण्याचं महापालिकेचं टार्गेट असतं. 

परदेशी यांना अर्थ, शहरी विकास मंत्रायल, महसूल, वन विभागासहित अनेक विभागांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. १९९३ साली लातूरमध्ये आलेल्या भूकंपानंतर डिएम म्हणून त्यांच्याच नेतृत्वाखाली पुनर्वसनाची कामे झाली होती. 


हेही वाचा-

अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी प्रवीण परदेशी


पुढील बातमी
इतर बातम्या