Advertisement

अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मेहता यांच्या नियुक्तीचा आदेश संध्याकाळपर्यंत येणाऱ्या शक्यता आहे. या आदेशानंतर मेहता मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारतील.

अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती
SHARES

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मेहता यांच्या नियुक्तीचा आदेश संध्याकाळपर्यंत येणाऱ्या शक्यता आहे. या आदेशानंतर मेहता मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारतील. 

स्वेच्छानिवृत्तीमुळे संधी

राज्याचे मुख्य सचिव यु. पी. एस मदान यांनी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला असून सरकारने हा प्रस्ताव स्वीकारल्याचं म्हटलं जात आहे. मदान आॅक्टोबरमध्ये निवृत्त होणार होते. परंतु त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे मेहता यांच्याकडे सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्य सचिवपदाची संधी चालून आली आहे. मदान सेवा पूर्व करून निवृत्त झाले असते, तर कदाचित मेहता यांना ही संधी मिळाली नसती, कारण ते स्वत: सप्टेंबर महिन्यात निवृत्त होत आहे.

प्रस्ताव मंजूर 

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहीत लागू आहे. त्यामुळे मेहता यांच्या निवडीचा प्रस्ताव राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला निवडणूक आयोगाने मंजुरी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. 

मेहता यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याने मुंबई महापालिकेचं आयुक्तपद रिकामं होणार आहे. या पदासाठी अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी तसंच नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांची नावं चर्चेत आहेत.

हेही वाचा-

राणीच्या बागेत येणार गुजरातचे सिंह

कुख्यात गुंड अरूण गवळी मुंबईत, २८ दिवसांच्या सुट्टीवर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा