कुख्यात गुंड अरूण गवळी मुंबईत, २८ दिवसांच्या सुट्टीवर

गुन्हेगारी विश्वातील कुख्यात डाॅन अरुण गवळी उर्फ डॅडीला न्यायालयाने २८ दिवसांच्या सुट्टीवर बाहेर सोडलं आहे. अरुण गवळीने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात संचित रजेसाठी याचिका दाखल केली होती.

कुख्यात गुंड अरूण गवळी मुंबईत, २८ दिवसांच्या सुट्टीवर
SHARES

गुन्हेगारी विश्वातील कुख्यात डाॅन अरुण गवळी उर्फ डॅडीला न्यायालयाने २८ दिवसांच्या सुट्टीवर बाहेर सोडलं आहे. अरुण गवळीने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात संचित रजेसाठी याचिका दाखल केली होती. २५ मार्च रोजी सुनावणी दरम्यान गवळीची संचित रजा मंजूर करण्यात आल्याने तो २८ दिवसांच्या सुट्टीवर बाहेर आला आहे.


नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी शिक्षा

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. विशेष म्हणजे गवळी यापूर्वीही मुलाचं लग्न, आजारपण कारणांमुळे गवळी २ ते ३ वेळा जेलबाहेर आला आहे.  


पोलिस हालचालींवर लक्ष ठेवून

सध्या राज्यात निवडणुकांचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे गवळीला तुरुंगाबाहेर सोडण्यास परवानगी दिल्याचं कळतं. गवळी तुरूंगाबाहेर असला, तरी पोलिस त्याच्या आणि त्याच्या साथीदाराच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.



हेही वाचा-

ठाण्यात सेफ्टी टँक साफ करताना कामगार अडकले, तिघांचा मृत्यू

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र सादर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा