ठाण्यात सेफ्टी टँक साफ करताना कामगार अडकले, तिघांचा मृत्यू

ठाण्यातील ढोकाळी नाका येथील प्राइड प्रेसिडेन्सी लक्झेरिया या गृहसंकुल परिसरात सेफ्टी टँक साफ करण्यासाठी उतरलेले ८ कामगार गुदमरल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. या घटनेत ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५ कामगारांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे.

ठाण्यात सेफ्टी टँक साफ करताना कामगार अडकले, तिघांचा मृत्यू
SHARES

ठाण्यातील ढोकाळी नाका येथील प्राइड प्रेसिडेन्सी लक्झेरिया या गृहसंकुल परिसरात सेफ्टी टँक साफ करण्यासाठी उतरलेले ८ कामगार गुदमरल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. या घटनेत ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५ कामगारांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. अमित पुहाल (२०), अमन बादल (२१) आणि अजय बुंबक (२४) अशी मृत कामगारांची नावे आहेत.


 विषारी वायू 

ढोकाळी नाका येथील प्राइड प्रेसिडन्सी लक्झेरिया येथील मैदानात सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. या केंद्रातील टाकीच्या साफसफाईसाठी हे ८ कामगार टाकीत उतरले होते. परंतु टाकीचा अंदाज न आल्याने तसंच टाकीतील विषारी वायूमुळे हे सर्वजण टाकीत अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर कामगारांना बाहेर काढलं. त्यांना तातडीने ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु आठपैकी ३ कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जखमी कामगारांची नावे

१. विजेंद्र हतवाल (वय २५)

२. मनजित वैद्य (वय २५)

३. जसबिर पुहाल (वय २४)

४. अजय पुहाल (वय २१)

५. रुमेर पुहाल (वय ३०)



हेही वाचा-

हिमालय पूल दुर्घटने प्रकरणी मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र न्यायालयात सादर

वाकोल्यात डबलडेकर ब्रिजला धडकली



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा