हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र सादर

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात पोलिसांनी चौघांना अटक केली असून गुरूवारी न्यायालयात आरोपींविरोधात ६५० पानांचे आरोपपत्र सादर केले आहे

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र सादर
SHARES

मुंबईच्या सीएसएमटी परिसरातील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अखेर आझाद मैदान पोलिसांनी ६५० पानांचं आरोपपत्र आरोपींविरोधात न्यायालयात सादर केलं आहे. या आरोपपत्रात आरोपींची भूमिका, महापालिका कर्मचाऱ्यांचे जबाब, न्यायवैद्यकीय अहवाल, पोलिसांचा स्वतंत्र अहवाल, मृत व्यक्तींचे शवविच्छेदन अहवालाचा समावेश असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईच्या सीएसएमटी परिसरातील हिमालय पूल हा १४ मार्च २०१९ रोजी सायंकाळी कोसळला. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला. तर ३१ जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेनंतर या पुलाच्या देखभालीच्या प्रश्नावरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या पुलाच्या देखभालीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा झाल्याचं पोलिस चौकशीत पुढं आलं आहे.

त्यानंतर पोलिसांनी या दुर्घटनाग्रस्त पुलाचे आँडिट करणाऱ्या नीरज देसाईला अटक केली. त्याच्याविरोधात आयपीसी कलम ३०४ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यता आला. आतापर्यंत या गुन्ह्यात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यात एका महापालिका अभियंत्यासह एका निवृत्त महापालिका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुरूवारी न्यायालयात आरोपींविरोधात ६५० पानांचं आरोपपत्र सादर केलं आहे. तसेच अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.   

काय होता पालिकेचा अहवाल?

या २०१७-१८ वर्षाच्या ब्रिजच्या आॅडिटचं काम पालिकेचे एक्झिक्युटिव्ह  इंजिनिअर  ए.आर. पाटील यांच्या देखरेखीखाली झालं. तर २०१३-१४ साली या ब्रिजच्या दुरूस्तीचं काम असिस्टंट इंजिनिअर एस.एफ. काकुळते यांच्या देखरेखीखाली झालं. या कामाला निवृत्त महापालिकेचे इंजिनिअर एस.ओ. कोरी आणि त्यांचे असिस्टंट आर.बी तारे यांनी मान्यता दिल्याचं अहवालात म्हटलं आहे. 

तसंच या प्रकरणी कंत्राटदार आर.पी.एस. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीही तितकीच दोषी असल्याचं अहवालात म्हटलं असून महापालिकेने या कंपनीला ही शो काॅज नोटीस पाटवत तिचं नाव काळ्या यादीत नोंदवलं आहे. दरम्यान ब्रिजच्या दुरूस्तीबाबत चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी पोलिसांनी या ब्रिजच्या देखभालीचं काम एस.एफ काकुळते यांच्या देखरेखीखाली झाल्याने त्यांना या प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणी आझाद मैदानचे पोलिस अधिक तपास करत आहेत. या दुर्घटनेनंतर या प्रकरणात पोलिसांनी ४ जणांना अटक केली. 


हेही वाचा-

करण ओबेराॅयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

‘लोढा द पार्क’मध्ये चोरी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा