करण ओबेराॅयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

करणवरील सर्व आरोप खोटे असल्याचा दावा त्याची बहीण आणि मित्र-मैत्रिणींनी पत्रकार परिषदेत केला आहे. करणच्या पाठीमागे आपण सगळे खंबीरपणे उभे आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

SHARE

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करून तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अभिनेता करण ओबेराॅयला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणीनंतर करण ओबेराॅय न्यायालयातच ढसाढसा रडला.

पहिली सुनावणी 

पीडित महिला आणि करण ओबेरॉय २०१६ मध्ये रिलेशनशीपमध्ये होते. त्यावेळी करणने महिलेवर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर ते व्हिडीओ दाखवून तिच्याकडून त्याने महिलेकडून पैसे उकळले होते. याप्रकरणी २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार रविवारी करण ओबेरॉयला अटक केली. गुरूवारी याप्रकरणी पहिली सुनावणी झाली.


आरोप खोटे

करणवरील सर्व आरोप खोटे असल्याचा दावा त्याची बहीण आणि मित्र-मैत्रिणींनी पत्रकार परिषदेत केला आहे. करणच्या पाठीमागे आपण सगळे खंबीरपणे उभे आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. करणची बहिण गुरुमित ओबेरॉय, मैत्रिण पूजा बेदी,  सुधांशु पांडेय, शेरिन वर्गीश, चैतन्य भोसले आणि सिद्धार्थ हल्दीपुर या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. हेही वाचा -

कॅनाॅन कंपनीची बनावट उपकरणे विकणाऱ्यावर कारवाई

मेहुल चोक्सीची १५१ कोटींची संपत्ती जप्त
संबंधित विषय
ताज्या बातम्या