कॅनाॅन कंपनीची बनावट उपकरणे विकणाऱ्यावर कारवाई

कॅनाॅन या प्रसिद्ध कंपनीच्या नावाने बनावट वस्तू विकणाऱ्या एका दुकान मालकावर माता रमाबाई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महेश कुमारलाल गेला वाव्हिया (३०) असं या दुकान मालकाचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून ५७ हजार रुपयांचं कॅनाॅन कंपनीचं बनावट साहित्य ताब्यात घेतलं आहे.

कॅनाॅन कंपनीची बनावट उपकरणे विकणाऱ्यावर कारवाई
SHARES

कॅनाॅन या प्रसिद्ध कंपनीच्या नावाने बनावट वस्तू विकणाऱ्या एका दुकान मालकावर माता रमाबाई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महेश कुमारलाल गेला वाव्हिया (३०) असं या दुकान मालकाचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून ५७ हजार रुपयांचं कॅनाॅन कंपनीचं बनावट साहित्य ताब्यात घेतलं आहे. 

जगप्रसिद्ध कॅनाॅन कंपनीच्या बनावट साहित्याची विक्री बाजारात होत असल्याची महिती कंपनीला मिळाली होती.  कंपनीने आपल्या साहित्याच्या विक्रीचे अधिकार C3i Consultants India Private Limited कंपनीला दिले आहेत. करारानुसार कॅनाॅनच्या वस्तूंची नक्कल करणाऱ्या किंवा बनावट वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे या दोन्ही कंपन्यांना अधिकार आहेत. 

त्यानुसार माता रमाबाई मार्ग पोलिस ठाणे परिसरातील सभंवा चेंबरमधील महेश कुमारलाल गेला वाव्हिया यांच्या दुकानात कॅनाॅनच्या बनावट उपकरणांची विक्री होत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार C3i Consultants India Private Limited या कंपनीच्या मॅनेजरने याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी महेश कुमारलाल गेला वाव्हिया याच्या दुकानाची झडती घेतली असता त्यांच्या दुकानात कॅनाॅनची अनेक बनावट उपकरणे आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्याला ताब्यात घेतलं आहे.  

हेही वाचा-

पुरुषांसाठी 'MenToo' चळवळ सुरू करायची गरज: पूजा बेदी

झाकीर नाईकच्या खात्यात ४९ कोटी, ईडीचा न्यायालयात दावा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा